Samsung Galaxy A16 5G Price in India: सॅमसंगने भारतीय बाजारपेठेत आपला नवा स्मार्टफोन Samsung Galaxy A16 5G लाँच केला आहे. याआधी Galaxy A16 5G आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाँच झाला होता. यामध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा डिस्प्ले मिळतो, जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. यामध्ये IP54 रेटिंग मिळते. याचा अर्थ हा मोबाईल डस्ट आणि वॉटर रजिस्टंट आहे.हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेत मिळतो. 


Samsung Galaxy A16 5G ची किंमत किती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने हा फोन दोन कॉन्फिग्रेशनमध्ये लाँच केला आहे. Samsung Galaxy A16 5G च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 18 हजार 999 रुपये आहे. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 20 हजार 999 रुपये आहे.


हा फोन तुम्ही सँमसंगच्या अधिकृत बेवसाईट, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इतर रिटेल पार्टनर्सकडून खरेदी करु शकता. Axis Bank आणि SBI च्या कार्डवरुन खरेदी केल्यास 1000 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. 


काय आहेत स्पेसिफिकेशन्स?


Samsung Galaxy A16 5G मध्ये 6.7 इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले मिळतो, जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. या डिव्हाइसमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर मिळतो. यामध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेजपर्यंतचा पर्याय मिळतो.


तुम्ही मायक्रो कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत एक्स्पांड करु शकता. कंपनीने या फोनमध्ये 6 वर्षं अपडेट देण्याचं आश्वासन दिलं आहे. यासह सहा वर्षांपर्यंत सेक्युरिटी अपडेट्स मिळत राहणार. फोनमध्ये 50MP च्या मेन लेन्सवाला ट्रिपर रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. 


फोनमध्ये 5MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर असेल. तसंच फ्रंटला, कंपनी 13MP सेल्फी कॅमेरा देत आहे. डिव्हाइसमध्ये 5000mA बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W चार्जिंगला सपोर्ट करते. त्याला NFC सपोर्ट देखील असेल.