मुंबई : दक्षिण कोरियाई कंपनीने दोन स्मार्टफोन Samsung Galaxy A6 आणि Galaxy A6+ लॉन्च केले आहेत. ग्लोबल साईटवर याचे स्पेसिफिकेशन आणि फिचर्स जाहिर करण्यात आले आहेत. या फोन्सचे वैशिष्ट्य म्हणजे याचा कॅमेरा आणि डिजाईन. हा हॅंडसेट ब्लॅक, गोल्ड, ब्लू आणि लवेंडर रंगात उपलब्ध आहे. दोन्ही हॅंडसेटमध्ये सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. हाच डिस्प्ले पूर्वी Galaxy S, Galaxy Note आणि Galaxy A8 सिरीजमध्ये देण्यात आला होता. Samsung Galaxy A6 मध्ये 5.6 इंचाचा डिस्प्ले आहे. तर Samsung Galaxy A6+ मध्ये 6.0 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. दोघांचाही आस्पेक्ट रेशो 18:5:9 आहे.


मेमरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा फोन अॅनरॉईड 8.0 ओरियोवर चालतो. यात असणारा ऑक्टा-कोर प्रोसेसर, ज्याचा सर्वाधिक स्पीड Samsung Galaxy A6 साठी 1.6 गीगाहर्ट्ज़ आणि Samsung Galaxy A6+ साठी 1.8 गीगाहर्ट्ज आहे. दोन्ही हॅंडसेटमध्ये 32 जीबी व 64 जीबी मेमरी देण्यात आली आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये बिक्सबी, बिक्सबी विजन, होम आणि रिमाईँडरची सुविधा देण्यात आली आहे.


कॅमेरा


Samsung Galaxy A6 मध्ये 16 मेगापिक्सलचा रियर ऑटोफोकस सेंसर आहे. तर फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल आहे. दोन्ही हॅंडसेटमध्ये रियरमध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. Samsung Galaxy A6 सीरीजमध्ये 3000 व 3500 एमएएच ची बॅटरी आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी  Samsung Galaxy A6 मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy A6+ मध्ये 24 मेगापिक्सलचा फ्रंट सेंसर आहे. त्याचबरोबर हा फोन बोकेह इफेक्टमध्येही काम करतो.


किंमत


दोन्ही स्मार्टफोनची जर्मनीमध्ये प्री-ऑर्डर सुरु करण्यात आली आहे. Samsung Galaxy A6 ची किंमत  309 यूरो म्हणजे सुमारे 24,750 रुपये आहे. तर Samsung Galaxy A6+ साठी तुम्हाला 369 यूरो म्हणजेच सुमारे 29,500 रुपये मोजावे लागतील. मात्र हे दोन्ही स्मार्टफोन्स भारतात कधी लॉन्च होणार याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही आहे.