मुंबई : साऊथ कोरियाची कंपनी Samsung ने नवा स्मार्टफोन Galaxy A9 भारतात लाँच केला आहे. कंपनीने नवी दिल्लीमधील आयोजित एका कार्यक्रमात या स्मार्टफोनला लाँच केलं आहे. हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये 4 रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅमसंग गॅलेक्सी ए9 मध्ये 6.3 इंच फूल एचडी आणि सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन अॅड्रॉयड 8.0 ओरियोवर काम करतो. फोनमध्ये 2.2 गीगा हर्ट्जवर चालणारा स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर देण्यात आला आहे.


स्मार्टफोनला 8 जीबी रॅम/8 जीबी रॅमे वेरिएंट आहे. तसेच 120 जीबी इंटरनल स्टोरेज देखील देण्यात आला आहे. ज्याला मायक्रोएसडी कार्डमार्फत 512 जीबीपर्यंत वाढवू देखील शकाल. या स्मार्टफोनमध्ये चाक रिअर (24MP+10MP+8MP+5MP) कॅमेरे आहेत. सेल्फीकरता या फोनमध्ये 24 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 


या स्मार्टफोनची किंमत 


भारतात या स्मार्टफोनची 6 जीबी रॅम, 128 जीबी रॅम इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 36,990 कुपये आणि 8 जीबी रॅम, 128 जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 39,990 रुपये आहे. 


तसेच हा स्मार्टफोन काळ्या, निळ्या आणि गुलाबी रंगात उपलब्ध आहे. HDFC च्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून खरेदी करण्यावर ग्राहकांना  3 हजार कॅशबॅक मिळणार आहे. भारतात याची प्री बुकिंग आजपासून म्हणजे 20 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून विक्री 28 नोव्हेंबरला होणार आहे.