नवी दिल्ली : तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. नव्या वर्षात अनेक ई-कॉमर्स कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स सादर करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता, ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने एक जबरदस्त ऑफर उपलब्ध केली आहे. या ऑफरनुसार, SAMSUNG गॅलेक्सी नोट 8 खूपच स्वस्तात उपलब्ध झाला आहे.


तुम्ही SAMSUNG गॅलेक्सी नोट 8 अॅमेझॉनच्या माध्यमातून स्वस्तात खरेदी करु शकणार आहात. मात्र, त्यासाठी अॅमेझॉनकडून काही अटी आणि नियम ठेवण्यात आले आहेत.


8 हजारांचा कॅशबॅक


अॅमेझॉन इंडियातर्फे लॉन्च करण्यात आलेल्या या ऑफरनुसार, SAMSUNG गॅलेक्सी नोट 8 (Samsung Galaxy Note 8) वर 8000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. हा कॅशबॅक ग्राहकांना अॅमेझॉन पे वरुन पेमेंट केल्यास बॅलेंसच्या स्वरुपात मिळणार आहे. 


SAMSUNG गॅलेक्सी नोट 8 हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. हा कंपनीने 2017मध्ये लॉन्च केला होता. या फोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. याची किंमत 67,900 रुपये आहे. कॅशबॅकसोबतच फोनवर इतरही ऑफर्स दिल्या जात आहेत. 


या आहेत इतर ऑफर्स...


अॅमेझॉनकडून मिळणाऱ्या इतर ऑफर्सवर एक नजर टाकली तर त्यामध्ये एक्सचेंज ऑफरचाही समावेश आहे. जुन्या SAMSUNG गॅलेक्सी नोट 8 ला बदलून नवा फोन खरेदी केल्यास 5,520 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. म्हणजेच या दोन्ही ऑफर्सला एकत्र केलं तर, तुम्हाला 67,900 रुपयांचा SAMSUNG गॅलेक्सी नोट 8 हा फोन केवळ 44,380 रुपयांत मिळणार आहे.


याकडे लक्ष द्या


वर सांगितलेल्या ऑफरनुसार फोन खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा की ही कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर अॅमेझॉन गॅलेक्सी Note 8च्या केवळ  Midnight Black व्हेरिएंटवर उपलब्ध आहे.


अॅमेझॉन इंडिया गॅलेक्सी नोट 8च्या Maple Gold व्हेरिएंटवर 3,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काऊंटही दिला जात आहे.


फिचर्स


सॅमसंग गॅलक्सी नोट 8 मध्ये 6.3 इंचाचा Quad HD+ Super AMOLED(2960x1440 पिक्सेल) (521ppi) इन्फिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. सिक्युरिटी फिचर्समध्ये पॅटर्न पिन, पासवर्डसोबतच बायोमॅट्रिक लॉक, आय स्कॅनर, फिंगरप्रिंट स्कॅनर, फेशियल रिक्गनिशन सारख्या फिचर्सचा समावेश आहे.


या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 6GB रॅमसोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 3,300mAhची बॅटरी देण्यात आली आहे.