मुंबई : सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च झाला आहे. या फोनचं प्री बूकिंग आजपासून सुरु झालं असलं तरी २१ सप्टेंबरपासून विक्री सुरु होणार आहे. लॉन्च ऑफर म्हणून ग्राहकांना वायरलेस चार्जर आणि एकदा स्क्रीन रिप्लेसमेंटची वॉरंटी असणार आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून हा स्मार्टफोन खरेदी केल्यावर ग्राहकांना ४ हजार रुपयांचं कॅशबॅक मिळणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 ची किंमत 67,900 रुपये असणार आहे.


सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 ची फिचर्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- 6.3 इंच क्वाड एचडी सुपर अॅमोलेड डिस्प्ले, इनफिनिटी डिस्प्ले


- 64 जीबी, 128 जीबी, 256 जीबी इंटरनल मेमरी, मायक्रो एसडी कार्डचा पर्याय उपलब्ध


- 12 मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे, 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा


- 6 जीबी रॅम


- वायरलेस चार्जिंग


- 3,300 mAh बॅटरी


- 7.1.1 नुगा ऑपरेटिंग सिस्टिम


- मिडनाईट ब्लॅक आणि मेपल गोल्ड रंगामध्ये मिळणार