नवी दिल्ली : सॅमसंगचा स्मार्टफोन गॅलेक्सी नोट ८ ने गुरुवारी इंडिया मोबाईल क्राँग्रेसमध्ये अवॉर्ड मिळवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गॅलेक्सी नोट ८ या स्मार्टफोनला इंडिया मोबाईल क्राँग्रेसमध्ये 'गॅझेट ऑफ द ईयर' हा अवॉर्ड मिळाला. हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत १२ सप्टेंबर रोजी ६७,९०० रुपयांत लॉन्च करण्यात आला होता.


सॅमसंग इंडिया मोबाईल बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आसिम वारसी यांनी सांगितले की, गॅलेक्सी नोट ८ हा फोन लॉन्च करत आम्ही प्रीमियम स्मार्टफोनच्या श्रेणीत आमचं नेत्रृत्व मजबूत केलं आहे.


सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ चे फिचर्स


- या फोनची स्क्रिन ६.३ इंचाची आहे


- या फोनच्या मागच्या बाजूला दोन कॅमेरे आहेत आणि दोन्ही कॅमेरा १२ मेगापिक्सलचे आहेत


- दोन कॅमेऱ्यांपैकी एक वाईड अँगल लेंस आणि दूसरा टेलिफोटो लेंससोबत आहे


- फोनमध्ये ३,३०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे


- सॅमसंग नोट ८ मध्ये सॅमसेंग पे सुद्धा देण्यात आलं आहे


- फोनमध्ये ६ जीबी रॅम देण्यात आली आहे


- मेमरी - ६४ जीबी