२९ हजारांचा स्मार्टफोन अवघ्या ४०९० रुपयांत
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर सॅमसंगचा गॅलॅक्सी एस ७ हा स्मार्टफोन तुम्ही अवघ्या ४०९० रुपयांत खरेदी करु शकता. भारतात लाँच करताना या स्मार्टफोनची किंमत ४८ हजार रुपये इतकी होती.
मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर सॅमसंगचा गॅलॅक्सी एस ७ हा स्मार्टफोन तुम्ही अवघ्या ५०९० रुपयांत खरेदी करु शकता. भारतात लाँच करताना या स्मार्टफोनची किंमत ४८ हजार रुपये इतकी होती.
मोबाईल फेस्ट प्रमोशनल्स सेल्स इव्हेंटमध्ये सॅमसंगच्या या स्मार्टफोनच्या किंमतीत कपातही करण्यात आली होती. या इव्हेंटमध्ये गॅलॅक्सी एस ७ स्मार्टफोन २९ हजार ९९० रुपयांमध्ये विकला जात होता. शॉपिंग साईट फ्लिपकार्टनवे दमदार ऑफर सुरु केलीये. यात तुम्ही फ्लिपकार्टवरुन हा फोन ५०९० रुपयांत खरेदी करु शकता.
सॅमसंगने मार्च २०१६मध्ये हा स्मार्टफोन भारतीय बाजारांमध्ये दाखल झाला. अॅमेझॉनने यावर मोठी ऑफर दिली होती आणि वेबसाईटवर याची किंमत ३७ हजार ५०० रुपये केली होती. ऑगस्ट महिन्यात सॅमसंगने या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आताही हा स्मार्टफोन ४३ हजार ४०० रुपयांमध्ये विकला जातोय. मात्र या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टवर सर्वात मोठी ऑफर मिळते.
फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सॅमसंग मोबाईल फेस्टमध्ये लिमिटेड वेळेसाठी काही स्मार्टफोनवर सूट दिली जातेय. ६ नोव्हेंबरला हा फेस्ट सुरु झाला असून ८ नोव्हेंबरला संपणार आहे.
सॅमसंग गॅलॅक्सी एस ७ची किंमत १६,०१० रुपयांनी कमी कऱण्यात आलीये. त्यामुळे तुम्ही हा मोबाईल २९ हजार ९९० रुपयांना खरेदी करु शकता. कस्टमर्स एक्सचेंज ऑफरअंतर्गत अतिरिक्त २५ हजार रुपयांची सूटही मिळवू शकता.
जर तुम्हाला ही एक्सचेंज ऑफर मिळाली तर या मोबाईलची किंमत केवळ ४०९० इतकी होईल. याशिवाय मोबाईलवर नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायदेखील आहे. तुम्ही महिन्याला १६६७ रुपये ईएमआय भरुन मोबाईल खरेदी करु शकता.