आज लॉन्च होणार सॅमसंग गॅलक्सी S9 और S9+, हे आहेत फीचर्स
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सॅमसंगचा गॅलक्सी एक्स९ आणि गॅलक्सी एस९प्लस स्मार्टफोन आज लॉन्च होणार आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनच्या फ्लॅगशिप डिव्हाइसची बुकींग देशात २६ फेब्रुवारीपासून सुरू आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सॅमसंगचा गॅलक्सी एक्स९ आणि गॅलक्सी एस९प्लस स्मार्टफोन आज लॉन्च होणार आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनच्या फ्लॅगशिप डिव्हाइसची बुकींग देशात २६ फेब्रुवारीपासून सुरू आहे.
किती आहे किंमत?
गॅलक्सी एस९ आणि एस९प्लस स्मार्टफोनचं ६४ जीबी व्हर्जन काळ्या, निळ्या आणि जांभळ्या रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. दोन्ही डिव्हाइसचा २५६ जीबी व्हेरिएंट केवळ काळ्या रंगात उपलब्ध असेल. अमेरिकेत गॅलक्सी एस९ ची किंमत ७२० डॉलर(४७ हजार रूपये) आणि एस९ प्लसची किंमत ८४० डॉलर(५४ हजार रूपये) आहे.
बुकींग सुरू
फोनची बुकींग २ हजार रूपयात होत आहे. सॅमसंगच्या नव्या फोनची प्री-बुकींग ऑनलाईन स्टोरमध्ये होत आहे. भारतीय बाजारात या फोनच्या किंमतीची घोषणा केलेली नाहीये. गॅलक्सी एस९ आणि एस ९ प्लसमध्ये क्वालकॉमचं स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर आहे. एस९ मध्ये ३ हजार एमएएच आणि एस ९ प्लसमध्ये ३ हजार ५०० एमएएसची बॅटरी आहे.
स्पेसिफिकेशन
गॅलक्सी एस ९ आणि एस९ प्लस स्टोरेजचे तीन व्हेरिएंट ६४, १२८ आणि २५६ जीबीचे असतील. तिन्ही व्हेरिएंटची मेमरी मायक्रो एसडी कार्डने ४०० जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. Samsung Galaxy S9 मध्ये ५.९ इंचाची क्वाड एचडी प्लस कर्व्ड सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. फोनमध्ये सुपर स्पीड ड्यूल पिक्सल १२ मेगापिक्सलचा ऑटोफोकस सेंसर आहे.