Samsung Smartphone Launch: सॅमसंगने मोस्ट अवेटेड Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 लाँच केला आहे. डिव्हाइसच्या पुढील बाजूस क्लॅमशेल डिस्प्ले आहे, तर मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअपच्या बाजूला एक लहान बाह्य डिस्प्ले आहे. यात तळाशी एक यूएसबी टाइप सी पोर्ट आहे, ज्यामध्ये स्पीकर ग्रिल आणि मायक्रोफोन आहे. या स्मार्टफोन्सच्या लीकनुसार,  हँडसेटमध्ये FHD+ रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा AMOLED प्राथमिक डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, बाह्य पॅनेल 2.1-इंच स्क्रीन आहे, जी मागील फोनच्या 1.9-इंच स्क्रीनपेक्षा मोठी आहे.


Samsung Galaxy Z Flip 4 मध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 SoC असण्याची अपेक्षा आहे आणि 25W जलद चार्जिंगला समर्थन देणारा 3,700mAh बॅटरी पॅक असेल. इतर वैशिष्ट्यांमध्ये मागील बाजूस 12-मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा सेटअप, 8GB पर्यंत रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज समाविष्ट आहे.