मुंबई : सॅमसंगने आपल्या A सिरिजमधला नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. तो म्हणजे Samsung Galaxy A8+. यात सॅमसंगने फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलक्सी एस ८ आणि गॅलक्सी नोट ८ चे काही फिचर्स समाविष्ट केलेले आहे. म्हणजेच या फोनच्या माध्यमातून तुम्हाला आता कमी किंमतीत खास फिचर्स वापरता येतील. नवीन फोनमध्ये सॅमसंगने लाईव्ह फोकस, फेस रिकग्निशन तंत्र, बिक्सबी बॉयस असिस्टेंड आणि इनफिनिटी डिस्प्ले हे फिचर्स असतील. या फोन एक्सक्लूसिव्हली अॅमेझॉनवर २० जानेवारीपासून विक्रीस उपलब्ध होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दमदार फिचर्सचा हा फोन कमी किंमतीत उपलब्ध आहे. या नव्या स्मार्टफोनमुळे वनप्लस ५टी, नोकीया ८ आणि हॉनर व्हू १० या फोन्सना चांगलीच टक्कर मिळणार आहे. फोनचे डिझाईन गॅलक्सी एस८ आणि गॅलक्सी नोट ८ शी काहीसे मिळते जुळते आहे. कर्व्ड ग्लास, ग्लास बॅकपॅनल, आणि इनफिनिटी डिस्प्ले यामुळे हा फोन गॅलक्सी एस ८ आणि गॅलक्सी नोट ८ सारखाच दिसतो.



सॅमसंगने नव्या स्मार्टफोन Galaxy A8+ मध्ये 1080x2220 पिक्सल रिज्यूलूशनचा  6.0 इंचाचा सुपरएमलोईड फुल-एचडी डिस्प्ले दिला आहे. 



नवीन स्मार्टफोनमध्ये 1.6 गीगाहर्टजचे ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. हा फोन अॅनरॉईड 7.1 नूगावर चालतो. त्याचा परफॉरमन्स अतिशय दमदार असल्याचा कंपनीचा दावा आहे.



सॅमसंगने नव्या फोनमध्ये 4 GB आणि 6 GB रॅमचे दोन वेरिएंट दिले आहेत. 4 GB रॅम वेरिएंटमध्ये 32 GB स्टोरेज तर 6 GB रॅम वेरिएंटमध्ये 64 GB इंटरनल स्टोरेज आहे. त्याचबरोबर गरज असल्यास तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 256 GB पर्यंत स्टोरेज वाढवता येईल. 



फोनच्या स्क्रीनवर डुअल सेल्फी कॅमेऱ्याचे सेटअप आहे. एक सेंसर 16 मेगापिक्सल तर दुसरे 8 मेगापिक्सल आहे. फोनचा रियर कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. 



फोनमध्ये फेस रिकग्निशन फिचर दिले आहे. कमी प्रकाशातही हा फोन वेगवेगळे चेहरे ओळखू शकेल, असा दावा कंपनीने केला आहे. त्याचबरोबर यात 3500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.