नवी दिल्ली : सॅमसंग इंडियाने बुधवारी गॅलक्सी जे7 प्राईम 2 (Galaxy J7 Prime 2) हा फोन लॉन्च केला. याची किंमत १३,९९० रुपये आहे. हा स्मार्टफोन मेक फॉर इंडिया फिचरसोबत येतो. ज्याचे नाव सॅमसंग मॉल आहे. यामध्ये युजर्स कोणत्याही गोष्टीचा फोटो काढून तो ऑनलाईन सर्च करुन ई-कॉमर्स वेबसाईटवरुन खरेदी करु शकता. यात 5.5 इंचाचा फुल एचडी स्क्रीन देण्यात आली असून त्याचे डिझाईनही इतके छान आहे की हातात पकडण्यासाठी सोपे होईल, असा दावा कंपनीने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅमसंगच्या नव्या फोनमध्ये १.६ गीगाहर्टजचे एक्सीनोस ऑक्टा-कोर प्रोसेसर, 3 GB रॅम आणि 32 GB इंटरनल मेमरी आहे. ही इंटरनल मेमरी मेमरी कार्डच्या माध्यमातून 256 GB पर्यंत वाढवता येईल. फुल मेटल युनीवॉडी डिझाईन असलेल्या या फोनमध्ये 2.5 डी ग्लास लावण्यात आले आहे. याचे फिंगरप्रिंट सेंसर पुढच्या बाजूला आहे. फोनच्या दोन्ही सेंसरचे अपरचर F 1.9 आहे. या डिव्हाईसमध्ये सॅमसंग पे मिनी फिचर देण्यात आले आहे. मीडिल रेंज युजर्सचा विचार करुन याची निर्मिती करण्यात आली आहे.


कॅमेरा


सॅमसंगच्या नव्या फोनमध्ये १३ मेगापिक्सचा फ्रंट कॅमेरा आणि तेवढाच रिअर कॅमेरा आहे. फोनचे दोन्हीही सेंसरचे  अपरचर F 1.9 आहे. या स्मार्टफोनची एक खासियत म्हणजे सोशल कॅमेरा आहे. यात लाईव्ह स्टीकर्स, फिल्टर आणि इंस्टेंट एडिट व शेअर यांसारखे फिचर्स आहेत.


डिस्प्ले


Samsung Galaxy J7 Prime 2 मध्ये ५.५ इंचाची  1080x1920 पिक्सल रिजोल्यूशनचा फुल-एचडी डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये 1.6 गीगाहर्ट्जचे ऑक्टाकोर एक्सीनॉस 7 सीरीज प्रोसेसर आहे.


रॅम आणि रोम


फोनमध्ये 3 GB रॅम सोबत 32 GB चा इंटरनल स्टोरेज आहे.  ही इंटरनल मेमरी मेमरी कार्डच्या माध्यमातून 256 GB पर्यंत वाढवता येईल. स्मार्टफोनमध्ये ६० फ्रेम प्रती सेकंदाचा फुल एचडी व्हिडिओ प्ले करण्याची क्षमता आहे.


बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी


Samsung Galaxy J7 Prime 2 मध्ये 3300 mAh ची बॅटरी आहे. स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय 802.11 बी/जी/एन, जीपीएस, ब्लूटूथ 4.1, हेडफोन, 3G आणि 4G फीचर्स आहेत. हॅंडसेटमध्ये एक्सेलेरोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर दिला आहे.