मुंबई : सॅमसंगने  Galaxy Z Flipने स्मार्टफोनसह Galaxy S20 सीरीज लॉन्च केली आहे. कंपनीने Galaxy S10 प्रमाणे यावेळीही या सीरीजचे तीन स्मार्टफोन Galaxy S20, Galaxy S20+ आणि  Galaxy S20 Ultra लॉन्च केले आहेत. या तीन स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आणि डिस्प्ले साइजचं अंतर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तीनही स्मार्टफोनमध्ये एकसारखाच प्रोसेसर वापरण्यात आला आहे. पण या Galaxy S20, Galaxy S20+ आणि  Galaxy S20 Ultra मध्ये कॅमेरा, बॅटरी आणि डिस्प्ले यांसारख्या फिचर्समध्ये बदल करण्यात आले आहेत.


काय आहेत फिचर्स -


- या तिनही फोनमध्ये QHD (1,440x3,200 पिक्सल) रिजोल्यूशन
- AMOLED 2X डिस्प्ले
- १२८ जीबी स्टोरेजसह ८जीबी ते १२ जीबी पर्यंतचा रॅम देण्यात आला आहे. 
- Galaxy S20 मध्ये ४०००mAH बॅटरी, तर Galaxy S20 + मध्ये ४५००mAHची बॅटरी देण्यात आली आहे.


कॅमेरा -


सॅमसंगच्या या स्मार्टफोन्समध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात सुपर स्पीड डुअल पिक्सल AF आणि OISसह, १२MP वाइड ऍन्गल सेन्सर, १२MP अल्ट्रा-वाइड ऍन्गल सेन्सर आणि PDAF आणि OISसह ६४MP टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला. 



Galaxy S20ची किंमत जवळपास ७१,३०० रुपये आणि Galaxy S20 +ची किंमत जवळपास ८५,५०० रुपये असण्याची शक्यता आहे.