मुंबई : दक्षिण कोरियाची इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगनं दोन नवे स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी जे4+ आणि सॅमसंग गॅलेक्सी जे6+ हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल झाले आहेत. या दोन्ही फोनमधली काही फिचर एकसारखीच आहेत. दोन्ही स्मार्टफोनना ६ इंचाचा एचडी+इनफिनिटी डिस्प्ले आहे. याचा अॅसपेक्ट रेशो १८.५ : ९ आहे. दोन्ही फोनची बॅटरी ३,३०० एमएएच आहे. दोन्ही स्मार्टफोनना स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर वापरण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये इमोटिफाय फिचर आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये साईड फिंगरप्रिंट सेंसर, इमोटिफाय, मायक्रोएसडी कार्डवर अॅप इन्स्टॉल करण्याची सोय आणि ग्लास फिनिश देण्यात आलं आहे.


काय आहे फोनची किंमत


सॅमसंग गॅलेक्सी जे4+ ची किंमत १०,९९० रुपये आहे. हा फोन काळ्या आणि निळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. तर गॅलेक्सी जे6+ ची किंमत १५,९९० रुपये आहे. हा स्मार्टफोन काळा, निळा आणि लाल रंगात मिळणार आहे. या दोन्ही स्मार्टफोनची विक्री अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, सॅमसंग ऑनलाईन स्टोर आणि रिटेल स्टोरमध्ये होणार आहे.


सॅमसंग जे4+ चे फिचर्स


ऑपरेटिंग सिस्टिम- अॅन्ड्रॉईड ८.१ ओरियो


१.४ गीगाहर्ट्ज क्वाड-कोर चिपसेट


२ जीबी रॅम


३२ जीबी इंटरनल मेमरी


१३ मेगापिक्सल रियर कॅमेरा, अपार्चर एफ/१.९


एलईडी फ्लॅश


सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा


सॅमसंग जे6+ चे फिचर्स


ऑपरेटिंग सिस्टिम- अॅन्ड्रॉईड ८.१ ओरियो


१.४ गीगाहर्ट्ज क्वाड-कोर चिपसेट


४ जीबी रॅम


६४ जीबी इंटरनल मेमरी


दोन रियर कॅमेरे, प्रायमरी १३ मेगापिक्सल, सेकंडरी ५ मेगापिक्सल


सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा