नवी दिल्ली : सॅमसंगने चाहत्यांसाठी खास दोन डिस्प्ले असलेला सॅमसंग एसएम-जी ९२९२ हा फोन लाँच केला आहे. या फोनला गेल्यावर्षी कंपनीने चीनमध्ये ब्लॅक करंट वेरिएंटमध्ये लाँच केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता नव्या फोनमध्ये कंपनीने आणखी आकर्षक फिचर्स दिले आहेत. ग्राहकांना विचार पडला आहे की सॅमसंगचा हा दोन डिस्प्ले असलेला फोन नेमका कसा काम करणार आहे? कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या फोनचा एक डिस्प्ले हा आतमध्ये आणि दुसरा डिस्प्ले हा बाहेरच्या बाजूला असणार आहे. 


जाणून घ्या सॅमसंग एसएम-जी ९२९८ चे खास फिचर्स 



दक्षिण कोरियाच्या या कंपनीने गेल्यावर्षी हा फोन चीनमध्ये डब्ल्यू २०१७ (w2017) नावाने लाँच केला आहे. आता याचं अपग्रेड वर्जन सॅमसंग एसएम-जी ९२९८ ला लाँच केलं आहे. नवीन फोन असलेला सॅमसंग जी - ९२९८ म्हणजेच लीडर ८ मध्ये गेल्यावर्षी लाँच केलेल्या डब्ल्यू 2017 पेक्षा तुलनेत अधिक आकर्षक प्रोसेसर आणि उत्कृष्ठ कॅमेरा आहे.


ड्युअल सिम असलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 4.2 इंच फुल एचडी (1080*1920 पिक्सल्स) सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. यामध्ये एक क्वाडकोर स्नॅपड्रॅगन ८२१ प्रोसेसर असून ज्याचे दोन कोर २.१५ गीगाहर्टस वर आणि दुसरे दोन 1.6 गीगाहर्टजवर चालत आहेत. सॅमसंग एसएम-जी ९२८ मध्ये ४ जीबी रॅम आहे. सॅमसंगने एसएम-जी ९२९८ मध्ये १२ मेगापिक्सल रियल कॅमेरा दिला आहे. 


त्याचप्रमाणे फोनमध्ये ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. ज्याला मायक्रोएसडी कार्डमुळे २५६ जीबी इतकं देखील वाढविता येणार आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये ४ जीसोबतच मायक्रो यूएसबबी, यूएसबी २.०, ब्ल्यूटूथ ४.१, एनएफसी, वाय-फाय, आणि जीपीएस सारखे फीचर्स आहेत. फोनची २३०० एमएचची बॅटरीमुळे ६८ तासापर्यंत स्टॅंडबाय टाइम मिळण्याचा दावा केला आहे.