सॅमसंगच्या `या` स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत
स्मार्टफोन खरेदीदारांसाठी हा मोठा पर्याय आहे.
मुंबई : Samsung Galaxy M32 जून 2021 मध्ये लाँच झाला होता. चांगल्या फिचर्सने परिपुर्ण असलेल्या या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्टफोन खरेदीदारांसाठी हा मोठा पर्याय आहे.
Samsung Galaxy M32 ला सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर Rs.12,999 च्या किमतीत लिस्ट केले गेले आहे, तर आधी त्याची किंमत Rs.14,999 होती. याचा अर्थ कंपनीने Samsung Galaxy M32 मध्ये 2,000 रुपयांची कपात केली आहे. जर तुम्हाला हा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्ही Amazon वर या किमतीत खरेदी करू शकता. ही ऑफर काही वेळेपुरतीच मर्यादित आहे.
फिचर्स
- फोनमध्ये octa-core MediaTek Helio G80 प्रोसेसर
- 6.4-इंचाचा FHD + डिस्प्ले मिळेल, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो.
- कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची कोटिंग
- ड्युअल सिम स्मार्टफोन
- स्मार्टफोनमध्ये क्वाड-रियर कॅमेरा सेटअप, LED फ्लॅशसह 64MP मुख्य सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सरचा, तसेच सेल्फीसाठी 20MP सेल्फी शूटर देखील आहे.
- 6000mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट
सॅमसंग ने आपल्या Galaxy M32 ची किंमत 2,000 रुपयांनी कमी केली आहे, त्यानंतर या फोनची किंमत 14,999 वरून 12,999 वर आली आहे. या फोनमध्ये दोन स्टोरेज प्रकार आहेत - 4GB + 64GB आणि 6GB + 128GB, परंतु ग्राहकांना फक्त 4GB + 64GB व्हेरिएंटवर सूट दिली जात आहे.