पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : कोणतेही गोष्ट आपण विकत घेतल्यावर आपल्याला नेहमी वाटतं की वस्तू जास्तीत जास्त वर्ष ( item lasts for a long time) टिकावी. परंतु अनेकदा व्यवस्थित त्या वस्तू वापरुन देखील ती वस्तू लवकर खराब होतात. परंतु कंपनीने दिलेल्या वारंटी पीरियडमध्ये (warranty period) ती वस्तू खराब झाली तर ठीक... नाहीतर परत पैसे खर्च करुन त्याला नीट करण्यासाठी खर्च वाढतो. या सर्वांचा विचार करुन सॅमसंग कंपनी (samsung company) त्यांच्या काही प्रोडक्टसवर 20 वर्षाची वॉरंटी (Product Saver 20 Years Warranty) देणार आहे. यामुळे ग्राहकांना ती वस्तू अनेक वर्षांपर्यंत सहज वापरुन पैशांची मोठी बचत (money saving big) होणार आहे.


20 वर्षांची वॉरंटी -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅमसंग (Samsung) ही भारतात त्यांच्या अनेक प्रोडक्टस वर 20 वर्षांची वॉरंटी ( Product Saver 20 Years Warranty) देणार असल्याचं सांगितलं आहे. ग्राहकांना अनेक वर्षांपर्यंतच्या वॉरंटी देण्यासाठी सॅमसंग कंपनी (samsung company) आता पाऊल उचलत आहे. त्यामध्ये वाशिंग मशीन (washing machine) मध्ये वापरलं जाणारं डिजिटल इन्वर्टर मोटर (digital inverter motor) आणि रेफ्रिजरेटर (refrigerator) मध्ये वारलं जाणारं डिजिटल इन्वर्टर कंप्रेसरवर (digital inverter compressor) दीर्घकालीन वॉरंटी (long term warranty) देणार आहे.


सॅमसंग कंपनीची माहिती


सॅमसंग इंडियाच्या (samsung india) कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स बिजनेसच्या सीनियर वाइस प्रेसिडेंट (Senior Vice President, Consumer Electronics Business ) मोहनदीप सिंह (Mohandeep Singh) यांनी सांगितलं की ग्राहकाचं समाधान (customer solution) करणं आमचं कर्तव्य आहे. तसेच वाशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटरमध्ये (washing machines and refrigerators) वापरल्या जाणा-या डिजिटल इन्व्हर्टर मोटर (digital inverter motor) आणि कंप्रेसरवर 20 वर्षांची वॉरंटी दिली आहे. सॅमसंग कंपनीचं म्हणणं आहे की हा उपक्रम ई- कचरा (e-waste) कमी करण्यासाठी आहे. तसेच उत्पादनांची विश्वासार्हता आणि टिकाऊपणा वाढवून टिकाऊपणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कंपनीवरील ग्राहकांचा विश्वास (customer confidence) टिकवून ठेवण्याची कंपनीने हा निर्णय घेतलाय.


'या' पाच चुका तुमचा Smartphone खराब करू शकतात, जाणून घ्या कसं ते


वेळ आणि ऊर्जाची बचत होणार


दरम्यान, घरातील उपकरणे वारंवार बदलल्यानं केवळ वेळ आणि ऊर्जा खर्च (Velocity and energy expenditure) होत नाही तर भौतिक कचरा (physical waste) देखील निर्माण होतो. त्यामुळे कंपनीने हे मोठं पाऊल उचल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या कंपनीच्या निर्णयमुळे ग्राहकांचं मोठा फायदा होणार असून त्यामुळे मोठी बचत होणार आहे.