'या' पाच चुका तुमचा Smartphone खराब करू शकतात, जाणून घ्या कसं ते

Smartphone Mistakes: स्मार्टफोन वापरताना बहुतेक लोक काही चुका करतात. या चुकांमुळे तुमचा स्मार्टफोन खराब होऊ शकतो. आज आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत, यामुळे स्मार्टफोनचं नुकसान होणार नाही.

Dec 02, 2022, 19:18 PM IST
1/5

Smartphone care tips

स्मार्टफोनवर व्हिडीओ पाहताना तसाच चालू ठेवून जाता आणि इतर कामं करता. यामुळे स्मार्टफोनचं नुकसान होऊ शकतं. व्हिडीओ कित्येक तास प्ले होत असल्याने फोनची बॅटरी आणि त्याचा प्रोसेसर खूप जास्त गरम होतो. त्यामुळे स्मार्टफोनचं नुकसान होऊ शकतं. 

2/5

Smartphone care tips

तुम्हाला स्मार्टफोनची बॅटरी जास्त काळ टिकवायची असेल तर तुम्ही कंपनीचाच चार्जर वापरावा. अन्यथा बॅटरी कमी खराब होऊ शकते.

3/5

Smartphone care tips

बरेच लोक पैसे वाचवण्यासाठी डुप्लिकेट स्मार्टफोन अॅक्सेसरीज वापरतात. यामुळे स्मार्टफोन हँग होऊ लागतो आणि नंतर इतका स्लो होतो की तुम्हाला त्यावर काम करणे खूप कठीण होतं.

4/5

Smartphone care tips

जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये जास्त स्टोरेज नसेल तर त्यामध्ये कॅपासिटी पाहून गेम डाउनलोड करा. जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त हेवी गेम्स डाउनलोड केले तर प्रोसेसरवर दबाव येऊ लागतो. भविष्यात स्मार्टफोन खराब होण्याचे कारण बनू शकतो.

5/5

Smartphone care tips

स्मार्टफोन चार्ज होत असताना सोशल मीडियाचा वापर, कॉलिंग करू नका. यामुळे स्मार्टफोनवर खूप दबाव येतो आणि चार्जिंग व्यवस्थित होत नाही. असे वारंवार केल्यास बॅटरी खराब होऊ शकते.