वाराणसी : काही दिवसांपूर्वी आंदोलनामुळे वादात सापडलेलं बनारस हिंदू विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पॉर्नच्या व्यसनावर उतारा म्हणून विद्यापीठाच्या न्यूरॉलॉजिस्टनी 'हर हर महादेव' नावाचं अॅप बनवलं आहे. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या बातमीनुसार डॉ. विजयनाथ मिश्रा यांनी या अॅपची निर्मिती केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे अॅप पॉर्न वेबसाईट ब्लॉक करतं, एवढंच नाही तर पॉर्न वेबसाईटवर जायचा प्रयत्न केला तरी भजनाला सुरुवात होते. सहा महिन्यांमध्ये बनवलेलं हर हर महादेव अॅप जवळपास ४ हजार पॉर्न, हिंसक आणि अश्लिल वेबसाईट्सना ब्लॉक करतं.


सध्या या अॅपवर फक्त हिंदू भजनंच आहेत. पण भविष्यात या अॅपमध्ये दुसऱ्या धर्माची गाणीही टाकण्यात येतील, असं डॉक्टर मिश्रा म्हणाले आहेत. भारतात सार्वजनिक ठिकाणी पॉर्न बघणं बेकायदेशीर आहे.