`Sarahah App`का होतयं ट्रेंडिंग ? काय आहेत साईड इफेक्ट्स?
हल्ली सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड आलेला दिसतोय. यामध्ये प्रत्येकजण त्याला आलेला मेसेज पब्लीकली शेअर करताना दिसतोय. कोणी मेसेज पाठवलाय या बद्दल मेसेज आलेल्याला कोणतीच माहिती नसते पण तो परफेक्ट अंदाज बांधण्याचा प्रयत्न करीत असतो. ही कमाल साराहाह या मजेशीर अॅप्लीकेशनची आहे. सध्या हे अॅप सर्वाधिक चर्चेत आहे. तुम्ही ही बातमी वाचेपर्यंत ‘साराहाह’ची लिंक तुमच्या फेसबुक फ्रेंड्सनी शेअर केली असेलच. तुम्हाला अजुनही याबद्दल माहिती नसेल तर ती लिंक नक्की बघा. गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर Sarahah च्या लिंक्सचा पूर आला आहे. या लिंकवर क्लिक करा आणि साईन इन करुन तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातला प्रश्न विचारु शकता किंवा तुमच्या मनातली भावना मांडू शकता.
मुंबई : हल्ली सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड आलेला दिसतोय. यामध्ये प्रत्येकजण त्याला आलेला मेसेज पब्लीकली शेअर करताना दिसतोय. कोणी मेसेज पाठवलाय या बद्दल मेसेज आलेल्याला कोणतीच माहिती नसते पण तो परफेक्ट अंदाज बांधण्याचा प्रयत्न करीत असतो. ही कमाल साराहाह या मजेशीर अॅप्लीकेशनची आहे. सध्या हे अॅप सर्वाधिक चर्चेत आहे. तुम्ही ही बातमी वाचेपर्यंत ‘साराहाह’ची लिंक तुमच्या फेसबुक फ्रेंड्सनी शेअर केली असेलच. तुम्हाला अजुनही याबद्दल माहिती नसेल तर ती लिंक नक्की बघा. गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर Sarahah च्या लिंक्सचा पूर आला आहे. या लिंकवर क्लिक करा आणि साईन इन करुन तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातला प्रश्न विचारु शकता किंवा तुमच्या मनातली भावना मांडू शकता.
एखाद्या आवडणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या व्यक्तीशी आपली ओळख लपवून खुप बोलायच असतं. म्हणजे भावना पण पोहोचवायच्या आहेत आणि ओळखही दिसली नाही पाहीजे. मग काय करायच ? तर जास्त विचार न करता Sarahah वर अकाऊण्ट कसं ओपन करायच. सौदी अरेबियातील जेन अबीदिन तौफिकने हे अॅप तयार केलं आहे. हे सोशल मीडिया अॅप असून जुलै 2017 मध्ये लेटेस्ट अपडेट करण्यात आलं आहे.पण हे करत असताना याचे इफेक्ट, साईड इफेक्ट याचीही माहिती असणे गरजेचे आहे.
Sarahah वर अकाऊण्ट कसं ओपन कराल?
Sarahah ओपन करण्याची पद्धत खुपच सोप्पी आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरची मदत लागणार आहे. त्यावरून तुम्ही Sarahah अॅप डाऊनलोड करु शकता. iOS फाइल 22 एमबी, तर अँड्रॉईड फाईल 12 एमबीची आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही साईन इन करा आणि या मजेशीर अॅप्लीकेशनचा आनंद घ्या. तुमच्या अकाऊंटची मेसेज लिंक फेसबुक अकाऊंटवर शेअर करा. यानंतर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तुमचे मित्र तुम्हाला मेसेज पाठवत जातील. तुम्हीही तुमच्या मित्रमैत्रीणींना 'छुपा संदेश' पाठवू शकता. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव तुम्हाला समजणार नाही, हीच या अॅपची गंमत आहे. संबंधित मेसेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज बॉक्स दिसेल. त्यावर तुम्ही तुमचं उत्तर लिहून पाठवू शकता.
Sarahah चा असा होऊ शकतो त्रास
Sarahah मध्ये मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त राहते. त्यामुळे ती व्यक्ती कोणालाही कशाही प्रकारचा मेसेज पाठवू शकते. जसे चांगले, मजेशीर मेसेज पाठवून सर्व या अॅपचा आनंद घेतात तसेच काही आंबट शोकीन शिवराळ किंवा अश्लील मेसेजच पाठवून त्रास देण्याचा प्रयत्नही करतात. तुम्हाला मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटणार नसल्यामुळे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे कठीण होते. पण अशा मेसेजविरोधात सायबर क्राईमकडे तक्रार करण्याचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे.