Microsoft hires Sam Altman : येत्या काळात तंत्रज्ञान क्षेत्रात उज्जवल भविष्य असणारी OpenAI या कंपनीने सीईओ आणि संस्थापक सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. कंपनीचा सॅम ऑल्टमनवरील विश्वास (No Confidence) उडाला असल्याचं कारण देत त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. अशातच आता तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी घडामोड झाल्याचं पहायला मिळत आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला (Satya Nadella) यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत सॅम ऑल्टमन मायक्रोसॉफ्ट (Microsoft) जॉईन्ड करत असल्याची घोषणा केली आहे.


काय म्हणाले Satya Nadella?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅम ऑल्टमन आणि ग्रेग ब्रॉकमन हे दोघंही मायक्रोसॉफ्ट जॉईन्ड करत असल्याचं सत्या नडेला यांनी सांगितलं आहे. सॅम ऑल्टमन आणि ग्रेग ब्रॉकमन मायक्रोसॉफ्टमध्ये नवीन प्रगत AI संशोधन कार्यसंघाचे नेतृत्व करणार आहेत, अशी माहिती देखील त्यांनी गिली. आम्ही एमेट शीअर (Emmett Shear) आणि ओएआय (OAI) च्या नवीन नेतृत्त्वाला जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत काम करण्यास तसेच त्यांना त्यांच्या यशासाठी आवश्यक संसाधने प्रदान करण्यासाठी उत्सुक आहोत. हे दोघंही मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार असल्याची बातमी शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे, अशी पोस्ट सत्या नडेला यांनी केली आहे.


नव्या प्रयोगासाठी नवीन जागा निर्माण करतोय. GitHub, Mojang Studios आणि LinkedIn सह Microsoft मध्ये स्वतंत्र ओळख आणि संस्कृती निर्माण करण्यासाठी संस्थापक आणि नवोदितांना जागा कशी द्यायची याबद्दल आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये बरेच काही शिकलो आहे आणि मी तुमचीही तशी अपेक्षा करत आहे, असं म्हणत सत्या नडेला यांनी सॅम ऑल्टमन यांचं स्वागत केलंय.


आणखी वाचा - Sam Altman : सॅम ऑल्टमन यांची सीईओ पदावरून हकालपट्टी, नेमकं कारण काय? गेम करणारे कोण?


दरम्यान, ओपनएआयच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुराती या अंतरिम सीईओ म्हणून काम करतील, असं ओपनएआय कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. सॅम ऑल्टमन यांना डच्चू दिल्यानंतर  जेकब पाचोकी, अलेक्झांडर माद्री आणि सिमोन सिडोर यांनी देखील राजीनामे दिले होते. त्यामुळे आता या तीन प्रमुख संशोधकांना मायक्रोसॉफ्टमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.