Save Car Engine From Rain Water: पावसाळ्यात गाड्यांचं सर्वाधिक नुकसान होतं. ऐन मोक्याच्या वेळी गाडी बंद पडण्याचं प्रमाण सर्वाधिक असतं. त्यामुळे पावसाळ्यात गाडीची काळजी घेणं गरजेचं आहे. इंजिन हा कोणत्याही वाहनाचा सर्वात महागडा भाग असतो आणि इंजिन बिघडले तर ते दुरुस्त करण्याचा खर्चही खूप जास्त असतो. किरकोळ प्रॉब्लेम असेल तर ठिक आहे, पण तुमच्या गाडीचे इंजिन सीझ झाले तर तुम्हाला लाखो रुपये खर्च करावे लागतील. पावसाळ्यात इंजिन खराब होण्याचं प्रमाण सर्वाधिक असते. तथापि, जेव्हा आपण आपलं वाहन पाणी भरलेल्या ठिकाणाहून नेता तेव्हा इंजिन खराब होण्याचं प्रमाण सर्वाधिक असतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुंबलेले पाणी नुकसान करू शकते!


पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबते आणि अनेक वेळा लोकं इतक्या पाण्यातून गाडी चालवतात. खासकरून सबवेतून गाडी नेताना काळजी घ्या. असे केल्यावर, वाहनाचे इंजिन सीझ होण्याचा धोका वाढतो. जर तुम्ही तुमचे वाहन पाणी साचलेल्या ठिकाणाहून न्यायचं असेल तर लगेच सावध व्हा. खरं गाडी पाण्यातून नेण्याची  चूक करू नका. पाणी तुंबलेले दिसल्यास तेथून जाण्यापूर्वी पाणी किती आहे याचा अंदाज घ्या आणि नंतर गाडी न्या.


काळजी घ्या


पाणी भरलेल्या ठिकाणाहून गाडी नेताना पाण्याचा अंदाज घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की गाडीचं बोनेट पाण्यात बुडू शकते. अशावेळी गाडी थांबवा. पाण्यातून गाडी नेण्याची चूक करु नका. अन्यथा इंजिनमध्ये पाणी जाऊन ते सीझ होण्याचा धोका असतो. शक्यतो इंजिनमध्ये लगेच पाणी जात नाही. असं असलं तरी खबरदारी घेणं आवश्यक आहे.