स्मार्ट कपड्यांना चार्ज करणारी कपड्यांवर आधारीत नवी बॅटरी
ही बॅटरी कापडांवर अधारलेली असून, कागद आणि मायक्रोबियन इंधनांच्या सेलद्वारे निर्माण होणाऱ्या उर्जेइतकीच ही बॅटरी उर्जा तयार करू शकते.
न्यूयॉर्क : तंत्रज्ञानाची कमाल कशा कशाचा शोध लावेल सांगताच नाही येत. याची असंख्य उदाहरणे यापूर्वी पहायला मिळाली आहेत. वैज्ञानिकांनी नुकताच एक शोध लावाला. हा शोध आहे एका बॅटरीचा. ही बॅटरी आहे कपडे चार्ज करणारी. साधे कपडे नव्हे स्मार्ट कपडे. काय आहे हे प्रकरण? घ्या जाणून...
वैज्ञानिकांनी एक अशा बॅटरीची निर्मिती केली आहे. जी जीवाणुंद्वारे चार्ज होऊ शकते. ही बॅटरी कपड्यांवर अधारीत असून, याद्वारे स्मार्ट कपडे आणि वापरलेले कपडे लवचीक आणि इलेक्ट्रॉनिक बनवता येऊ शकतात. अमेरिकेतील विंघम्टन विद्यापीठातील संशोधकांनी या बॅटरीची निर्मिती केली आहे. ही बॅटरी कापडांवर अधारलेली असून, कागद आणि मायक्रोबियन इंधनांच्या सेलद्वारे निर्माण होणाऱ्या उर्जेइतकीच ही बॅटरी उर्जा तयार करू शकते.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार वारंवार खेचले आणि वाकवले जाण्यामुळे तयार होणाऱ्या बायोबॅक्टेरियांनी उर्जा निर्माण करण्याची क्षमता दाखवली आहे. विद्यापीठातील सहाय्यक प्रोफेसर सियोखेयूं चोई यांनी सांगितले की, लवचिक आणि लांबण्यायोग्य उर्जा उत्पन्न करणाऱ्या उपकरणाद्वारे कपड्यांवर अधारीत बॅटरी तयार करता येऊ शकते. आम्ही बायोबॅटरीसाठी एक मानकीकृत संच तयार केला आहे. जो भविष्यात वापरण्यायोग्य इलेक्ट्रॉनिक कपड्यांची निर्मिती करू शकेले.