Maruti च्या `या` गाड्यांमध्ये सीट बेल्टचा Problem! 5002 युनिट्स परत मागवले, तुमची कार यात नाही ना
देशात मारुति सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. पण असं असलं तरी कंपनीच्या गाड्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे.
Maruti Car Unit: देशात मारुति सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. पण असं असलं तरी कंपनीच्या गाड्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. सील्ट बेल्टची समस्या जाणवत असल्याने ग्राहकांमध्ये कुजबूज सुरु आहे. प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर सीट बेल्टवर लक्ष केंद्रीत केलं जातं आहे. अशा परिस्थितीत तुमच्या कारमधील सीट बेल्ट नीट काम करत नसेल तर तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. अशाच एका समस्येमुळे मारुति सुझुकीने आपली काही वाहनं परत मागवली आहेत. कंपनीने एकूण 5,002 युनिट्स परत मागवले आहेत. मारुति सुझुकी इंडिया (MSI) ने त्यांच्या लाइट कमर्शिअल व्हिकल 'सुपर कॅरी' ड्रायव्हर साइड सीट बदलण्यासाठी वाहन परत मागवण्याची घोषणा केली आहे.
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या माहितीत सांगितलं आहे की, या प्रभावित वाहनांचे उत्पादन 4 मे ते 30 जुलै 2022 दरम्यान करण्यात आले होते. चालकाच्या बाजूच्या सीटच्या सीट बेल्टमध्ये दोष असल्याचा संशय आहे. त्यामुळे सीट बेल्टला जोडलेले बोल्ट तपासण्यासाठी आणि टॉर्क करण्यासाठी कंपनी ही वाहने परत मागवत आहे. बोल्ट टॉर्कमध्ये संभाव्य दोष असल्याचा संशय आहे, जो कालांतराने सैल होऊ शकतो. बाधित वाहन मालकांना मारुती सुझुकीच्या अधिकृत वर्कशॉपद्वारे माहिती दिली जाईल.
Hero ची नवी कोरी Splendor लाँच, कमी किमतीत चांगला मायलेज देणारी गाडी
मारुती सुपर कॅरी एक कर्मशिअल वाहन आहे. याचा वापर कार्गो म्हणून केला जाऊ शकतो. हे वाहन तीन प्रकारात विकले जाते. वाहनाची किंमत 4.73 लाख रुपयांपासून सुरू होते, ही किंमत पेट्रोल प्रकारासाठी आहे. त्याचे CNG मॉडेल 5.93 लाख रुपयांना (एक्स-शोरूम) विकले जाते.