Tata Nexon: केंद्र सरकारकडून 1 फेब्रुवारी रोजी वार्षिक अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. सामान्यपणे अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर अनेक गोष्टी महाग अथवा स्वस्त होतात. हीच गोष्ट गाड्यांनाही लागू होते. जुन्या गाड्यांवर बजेटमधील तरतुदींचा फार परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे. मात्र तुम्ही अर्थसंकल्प सादर होण्याआधी तुम्ही जुनी म्हणजेच सेकेण्ड हॅण्ड कार (2nd Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही खास पर्याय उफलब्ध आहेत. कार्स24 वेबसाईटवरील काही जुन्या टाटा नेक्सॉन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या गाड्यांची किंमत 6 लाखांपासून सुरु होते. जुन्या गाड्या विकत घेणाऱ्यांना रोड टॅक्स भरावा लागत नाही. कारण या गाड्यांचा रोड टॅक्स आधीच पहिल्या मालकाने गाडी विकत घेताना भरलेला असता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्स24 च्या वेबसाईटवर 2019 सालातील निर्मिती असलेली टाटा नेक्सॉन केराझ 1.2 मॅन्युएअलसाठी 6 लाख 11 हजार रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. पेट्रोल इंजिन असलेली ही गाडी 49 हजार 829 किलोमीटर धावली आहे. कार सध्या फर्स्ट ओनरकडेच आहे. या गाडीचा क्रमांक डीएल-5सी वरुन सुरु होतो. ही गाडी विक्रेसाठी नोएडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.


2019 सालातील निर्मिती असलेली टाटा नेक्सॉन एक्सएम 1.2 मॅन्युएअलसाठी 6 लाख 41 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. डिझेल इंजिनची ही कार सध्या फर्स्ट ओनरकडे असून ही कार आतापर्यंत 93 हजार 992 किलोमीटर धावली आहे. या गाडीचा क्रमांक डीएल-8सीवरुन सुरु होतो. ही गाडी सुद्धा नोएडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. 


2018 सालातील निर्मिती असलेली टाटा नेक्सॉन एक्सटी 1.5 मॅन्युएअल कार 6 लाख 82 हजार रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. डिझेल इंजिनची ही कार सध्या फर्स्ट ओनरकडे असून ही कार आतापर्यंत 76 हजार 34 किलोमीटर धावली आहे. या गाडीचा क्रमांक एच-10 वरुन सुरु होतो. ही गाडी सुद्धा नोएडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. 


मुंबईबरोबरच इतर शहरांमध्येही या गाड्या विक्रीसाठी उपलब्ध असून सर्वसाधारणपणे नेक्सॉनच्या सेकेण्ड हॅण्ड गाड्या या सहा लाखांपासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सेकेण्ड हॅण्ड गाड्या किती चालवण्यात आल्या आहेत याचबरोबर त्याबद्दलची सर्व तांत्रिक माहिती या वेबसाईटवर उपलब्ध असते. या गाड्यांची देवाण-घेवाण करताना ज्या कंपनीच्या माध्यमातून व्यवहार होत आहे ती सुद्धा ग्राहकांना आणि विक्रेत्यांना मदत करते.