एका जागी उभ्या कारमध्ये AC वापरणं योग्य की अयोग्य? आजच दूर करा तुमचा गैरसमज
Car AC Tips: चारचाकीतून प्रवास करताना जवळपास प्रत्येकजण एसीचा वापर करत असतो. पण अनेकदा उकाडा जास्त असल्याने पार्क करण्यात आलेल्या कारमध्येही एसीचा वापर होतो. पण हे कितपत योग्य आहे हे जाणून घ्या.
Car AC Tips: जून महिना सुरु असून, अद्यापही अपेक्षित पाऊस न पडल्याने देशभरात प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी तर तापमान 40 ते 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. उन्हाचा पारा पाहता अनेकजर तर दुपारी घराबाहेर पडणंही टाळत आहेत. देशभरात उष्णतेची लाट असून अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशा स्थितीत जर कुठे प्रवास करायचा असेल तर लोकांकडून कारचा वापर केला जात आहे. त्यातही कारमधून प्रवास करताना एसीचा वापर करावा लागतो. कारण खिडक्या उघड्या ठेवल्या तरी बाहेरुन येणारा वाराही गरमच असतो. पण काही लोकांच्या मनात नेहमी प्रश्न येतो की, कार एका जागेवर उभी असताना एसीचा वापर करावा का? जर तुमच्याही मनात अशी शंका असेल तर मग याचं उत्तर जाणून घ्या.
धावत्या कारमध्ये एसीचा वापर करण्यात तशी काहीच अडचण नाही. फक्त एकच अट आहे की, एसीची सर्व्हिसिंग झालेली असावी आणि तो व्यवस्थित काम करत असावा. उन्हाळाच्या दिवसांमध्ये कारमध्ये एसीची वापर करणं तशी सामान्य बाब आहे. पण एका जागी उभ्या किंवा पार्किंगमधील कारमध्ये एसी वापरणं योग्य की अयोग्य हे तुम्हाला माहिती आहे का? या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे.
एका जागी उभ्या कारमध्ये एसीचा वापर करणं अजिबात योग्य नाही. असं केल्याने फार नुकसान सहन करावं लागू शकतं. महत्वाचं म्हणजे तुमच्या गाडीचं इंजिन खराब होऊ शकतं. याचं कारण जेव्हा कार एका जागी उभी असते तेव्हा स्थितीत अनेक बदल झालेले असतात.
इंजिनवर जास्त जोर
एसी कॉम्प्रेसर कारच्या इंजिनाकडून चालवला जातो. एका जागेवर उभ्या कारमध्ये एसी लावल्यास इंजिनला सतत काम करावं लागतं. ज्यामुळे त्याच्यावरील ताण वाढतो. यामुळे इंजिनचे भाग घासले जाऊन खराब होऊ शकतात.
इंधनचा जास्त वापर
कारचं इंजिन कार्यरत राहण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते. एसी वापरल्याने इंजिनवर अतिरिक्त भार पडतो. यामुळे इंधनाचाही जास्त वापर होतो. खासकरुन उभ्या गाडीत एसी वापरल्यास इंजिनला फक्त एसी नीट चालावा यासाठी काम करावं लागतं. यामुळे इंधन जास्तीत जास्त वापरलं जातं.