Shraddha Murder Case: दिल्ली श्रध्दा वालकर हत्याकांडांनंतर (v) संपूर्ण देश हादरून गेला आहे. विकृत प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. गेल्या सहा महिन्यापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, अखेर पोलिसांनी या विकृती प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. या चौकशीदरम्यान आफताब आणि श्रद्धाची (Aftab and Shraddha) ओळख डेटिंग अ‍ॅपवर (Dating app) झाली होती. बंबल (Bumble Dating App) या नावाच्या डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून आफताब आणि श्रद्धा एकमेकांच्या संपर्कात आले होते. परिणामी या घटनेनंतर ऑनलाइन डेटिंग अॅप्स वापरताना राहा सावधगिरी बाळगा असेच म्हणावे लागेल...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Dating Apps चा वापर अधिक 


आजकाल अनेक जण डेटिंग अप्स (Dating App) वापरतात आणि या अप्सवर अनोळखी लोकांवर विश्वास देखील ठेवतात. पण, याचे नंतर किती गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात याची कल्पना दिल्ली प्रकरणावरून आलीच असेल. परिणामी Dating Apps वापरताना, डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून भेटलेल्या व्यक्तीसोबत मैत्री करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. भारतात या अ‍ॅपची लोकप्रियता मोठी असून, लाखो लोक याचा वापर करतात.


या अ‍ॅपवरून आफताब आणि श्रद्धाची ओळख


डेटिंग अॅप्समधील बंबल या अ‍ॅपवरून आफताब आणि श्रद्धाची ओळख झाली होती. हा अ‍ॅप  गुगल प्ले स्टोअरवर 10 दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलेले आहे. प्ले स्टोअरशिवाय हे अ‍ॅप Apple App Store वरदेखील खूप लोकप्रिय आहे. लाइफस्टाइल कॅटेगरित हे अ‍ॅप पाचव्या क्रमांकावर असून, याबाबत लाखो यूजर्सने रिव्ह्यू लिहले आहेत. अनेकजण टिंडरला पर्याय म्हणूनदेखील हे अ‍ॅप वापरू शकतात.


कधी लॉन्च करण्यात आले अ‍ॅप


बंबल अ‍ॅप 2014 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. हे टिंडर प्रमाणेच वापरले जाते. सर्वात प्रथम यूजरला या अ‍ॅपवर स्वतःचे प्रोफाइल तयार करावे लागते. यासाठी अ‍ॅपद्वारे काही तपशील विचारले जातात.


अ‍ॅपमध्ये आहेत तीन मोड


लोकप्रिय बंबल अ‍ॅपवर तीन मोड आहेत. यामध्ये एक मोड डेटिंगसाठी, दुसरा मैत्रीसाठी आणि एक बिझनेस नेटवर्किंगसाठी देण्यात आला आहे. यूजर त्याच्या गरजेनुसार यातील एका मोडची निवड करू शकतो. यानंतर अनेक प्रोफाईल यूजर्सच्या समोर येतात.


वाचा : श्रद्धाच्या वडीलांना पाहून आफताब म्हणाला, तुमच्या मुलीचा...!


महिलाच करू शकतात पहिला मेसेज


कंपनी फी घेऊन युजरचे प्रोफाईल बूस्ट करते. असे केल्याने यूजरचे प्रोफाइल अधिक लोकांना हायलाइट होते. बूस्ट करण्याचे चार्जेच वेगवेगळे असतात. या  चॅटिंगदरम्यान पहिला मेसेज फक्त महिलाच करू शकतात. या एकाच कारणामुळे या अ‍ॅपला फेमिनिस्ट डेटिंग अ‍ॅपदेखील म्हटले जाते.


 सुरक्षित डेटिंग प्रोफाइल
 
एका सुरक्षा फर्मच्या अहवालानुसार, ऑनलाइन डेटिंग अॅपवर डेटिंग प्रोफाइलमध्ये प्रामुख्याने तीन गोष्टी असतात. त्यात तुमचा फोटो, तुमचे नाव आणि तुमची आवड असते. यात, आपला खरा फोटो वापरा. परंतु, तो फोटो असा असावा, ज्यामुळे तुमचा पत्ता किंवा आणि इतर तपशील समोरच्याला माहित होणार नाही. डेटिंग अॅपवर पूर्ण नाव कधीही वापरू नका. डेटिंग अॅपवर इन्स्टाग्रामसारखे तुमचे सोशल मीडिया खाते कधीही अटॅच करू नका. याच्या मदतीने कोणीही तुमच्याबद्दलच्या अनेक गोष्टी सहज शोधू शकतो.  फोन नंबर किंवा मेसेजिंग अॅप हँडल कधीही शेअर करू नका. डेटिंग अॅपच्या बिल्ट इन मेसेजिंग प्लॅटफॉर्मचाच वापर करा. मॅच मिळाल्यावर त्यांना लगेच सगळी माहिती सांगू नका. तुम्ही अनोळखी व्यक्तीशी बोलत आहात हे प्रत्येक वेळी लक्षात ठेवा. नंतर तो तुमचा जीवनसाथी बनू शकतो, पण सुरुवातीला मात्र खूप सावधगिरी बाळगा. तसेच, भेटायला जायचे असल्यास पब्लिक प्लेसचाच विचार करा.