मुंबई : सध्या पेट्रेल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यात याच्या किंमती वाढतच चालल्या आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. ज्यामुळे आता लोकं दुसऱ्यापर्यायांकडे वळत आहेत. पेट्रेलसाठी सीएनजी हा एक चांगला पर्याय आहे. त्याची किंमत पेट्रोलच्या तुलनेत खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत, बरेच लोक त्यांच्या कारमध्ये सीएनजी किट बसवण्याचा विचार करत आहेत, जेणेकरून त्यांचा खर्च फार कमी होईल. पण बाजारातून सीएनजी किट लावण्यापूर्वी या पाच गोष्टी लक्षात ठेवा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्षात घ्या की, कारमध्ये बसवलेले सर्व सीएनजी किट खरे नसतात. अशा परिस्थितीत, तुमच्या कारमध्ये कोणतेही सीएनजी किट बसवण्यापूर्वी, त्याची सत्यता ओळखा. तसेच, तुम्ही स्थानिक विक्रेत्याला टाळावे आणि नोंदणीकृत विक्रेत्याकडूनच किट बसवून घ्यावे.


अनधिकृत डीलरकडून किट बसवू नका


काही कार मालक रस्त्याच्या कडेला असलेल्या डीलर आणि दुरुस्ती करणार्‍यांकडून किट बसवून घेतात. परंतु खराब दर्जाचे किट आणि अयोग्य फिटिंगमुळे ते लिक होऊ शकते, परिणामी गाड्यांना आग लागते.


कारमध्ये कोणतेही सीएनजी किट बसवण्यापूर्वी, तुमची कार सीएनजी किटला सपोर्ट करेल की नाही हे जाणून घेतले पाहिजे. बर्‍याच वेळा असे होते की, जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या कारमध्ये सीएनजी किट लावता, तर त्यामुळे कारमध्ये अनेक समस्या येऊ लागतात. सर्वप्रथम, तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की, तुमच्या कारमध्ये सीएनजी किट सपोर्ट करेल की नाही.


इंजिनची वॉरंटी संपते


सीएनजी किट ऑफ-मार्केटच्या बाहेर म्हणजेच शोरूमच्या बाहेर कारमध्ये बसवून घेतल्यावर कारच्या इंजिनवरील वॉरंटी संपते. यामुळे युजर्सचेही नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत, किट बसवण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा.