मुंबई : थंडीची सुरूवात झाली आहे.. या वातावरणात आपल्या कारची विशेष काळजी घ्यायला पाहिजे. काळजी न घेतल्यास गाडी सुरूवातीपासूनच त्रास द्यायला सुरूवात करते. थंडी वाढल्यामुळे गाडी चालण्यास कठीण होते त्यामुळे तुमच्या गाडीला अशा वातावरणात तयार करा. त्यामुळे वापरा या टिप्स... 


सर्विस 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळ्यात अनेकदा गाडी असणाऱ्यांना हा अनुभव येतो की, सकाळी गाडी स्टार्ट करताना खूप त्रास होतो. या समस्या त्या गाड्यांना येते ज्यांची मेंटनेस योग्य वेळी केली जात नाही. गाडीची सर्व्हिस काही महिन्यांनंतर करायची असेल तर हिवाळ्याच्या अगोदर ही सर्व्हिसिंग करून घ्या 


इंजिनची काळजी 


गाडीच्या इंजिन ऑइलची काळजी घेणं महत्वाचं आहे. जर ऑइल कमी असेल तर टॉप अप करा. याबरोबरच इंजिनचा बेल्ट आणि हौज देखील मेकॅनिककडून चेक करून घ्या. जर हे खराब असेल तर त्याचा ओवरलोडेड इंजिनच्या परफॉर्मन्सवर त्याचा परिणाम होतो. ऑइल फिल्टरची देखील काळजी घ्या. 


एझॉस्ट सिस्टम 


कारच्या एझॉस्ट सिस्टममध्ये हे चेक करून घ्या की कार्बन मोनो ऑक्साइड लीक होऊन सिस्टममध्ये येणार नाही. कारण या वातावरणात कारच्या बंद केबिनमध्ये याची थोडी मात्रा अडकली तरी ती खरतनाक असते. 


बॅटरी 


थंडीचा जास्त परिणाम हा गाडीच्या बॅटरीवर होत असतो. जर तुमच्या गाडीची बॅटरी तीन वर्षांपेक्षा जास्त जुनी झाली असेल तर एकदा मेकॅनिककडून तपासून घ्या. आणि गरज असेल तर बॅटरी बदलून घ्या. बॅटरीच्या टर्मिनलवर जर सफेद - पिवळ्या रंगाची पावडर जमा होत असेल तर हार्ड ब्रशने साफ करून द्या. 


लाइट्स 


थंडीत फॉगमुळे गाडी चालवणं कठीण होतं. जर तुमच्या गाडीत फॉग लाइट्स नसेल आणि तुम्ही हायवे वर अधिक ड्राइव करत असाल तर लाइटचा वापर अधिक कराल. यासोबतच गाडीच्या हेडलाइट्सची लाइट योग्य दिशेला जाते की नाही याची काळजी घ्या. लक्षात ठेवा एक्स्ट्रा लाइट्स लावणे योग्य नाही कारण यामुळे सिस्टमवर लोढ पडतो. 


टायर 


थंडीत जास्त गारवा असल्यामुळे रस्ते ओले होतात. जर तुमच्या गाडीचे टायर गुळगुळीत झाले असेल तर तुम्ही ते लगेच बदला. कारण ओल्या रस्त्यांवर गाडी घसरण्याची शक्यता अधिक असते. तसेच टायरमध्ये योग्य प्रेशर आहे की नाही तपासा कारण या वातावरणात टायरचा रब्बर थोडा घट्ट होतो. 


गाडीचा रंग खराब होऊ नये 


आपल्या गाडीचा रंग खराब होऊ नये म्हणून पॉलीमर वॅक्स लावून घ्या. या पेंटवर अशा प्रकारची कोटिंग लावली जाते. तसेच गाडीवर कव्हर टाकून देखील त्याचा रंग वाचवू शकतो. 


गाडीला गरम ठेवतो कूलेंट 


गाडीत इंजिन एरियात कूलेंटचा बॉक्स असतो. कूलेंट आपल्या गाडीला फक्त गरमीपासून वाचवतात असं नाही तर थंडीत देखील ते त्याची काळजी घेतात. त्यामुळे कूलेंटमध्ये थंडीत देखील पाणी टाकून ठेवा. 


फ्यूल टँक ठेवा फूल 


थंडीच्या वातावरणात फ्यूल टँक फुल ठेवल्यामुळे गाडी बंद राहत नाही. फ्यूल पंपमध्ये थंडीच्या दिवसात पाणी जमा होते. मात्र इंधनामुळे गरमी राहते आणि यामुळे गाडी थंड राहण्याची समस्या उद्भवत नाहीत.