या सोप्या पद्धतीने जाणून घ्या, तुमचे फेसबुक अकाऊंट कोणी चेक केले
फेसबूक ही सोशल मीडिया साईट जगभरात प्रसिद्ध आहे. वैयक्तिक आणि व्यायसायिक अशा दोन्ही प्रकारे फेसबुकचा वापर करता येतो.
नवी दिल्ली : फेसबूक ही सोशल मीडिया साईट जगभरात प्रसिद्ध आहे. वैयक्तिक आणि व्यायसायिक अशा दोन्ही प्रकारे फेसबुकचा वापर करता येतो. काही वेळा आपण इतरांचे प्रोफाईल चेक करतो. तसंच आपलं प्रोफाइल कोण चेक करतं का ? हा प्रश्न देखील आपल्याला पडतो. पण आता ही उत्सुकता ताणण्याची काही आवश्यकता नाही. कारण अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे जाणून घेऊ शकता.
स्टेप १ :
गुगल क्रोममध्ये उजव्या बाजूला दिलेल्या डॉट वर क्लिक करा. त्यात सेटिंग्सवर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. मग सर्च बॉक्समध्ये extensions लिहून एंटर करा. मग स्क्रीनवर खूप ऑपशन्स येतील. त्यातील Get more extensions वर क्लिक करा.
स्टेप २ :
Get more extensions वर क्लिक केल्यावर नवीन विंडो ओपन होईल. मग डाव्या बाजूला दिलेल्या सर्च ऑप्शनमध्ये Flatbook लिहून एंटर करा. अॅड ऑप्शन येईल. Flatbook अॅड झाल्यावर प्रोसेस पूर्ण होईल. मग तुम्हाला कळेल की कोणी कोणी तुमचे प्रोफाईल चेक केले आहे.