मुंबई: तुम्ही आम्ही सर्वजण ओलीची सेवा वापरतो. ओलानं ग्राहकांच्या फायद्यासाठी अनेक खास सुविधा आणल्या आहेत. नुकतंच ओलाने बाजारात आपली ई-स्कूटर लाँच केली. ही स्कूटर नागरिकांना वापरायला कधी मिळणार याची उत्सुकता होती. ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. ओलाने याबाबत नुकतीच माहिती दिली. ओला कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर (OLA e-scooter) आज पासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली. ओला कंपनीने ही स्कूटर ग्राहकांसाठी 2 वेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिली S1 आणि दुसरी S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर. तरूणांसाठी आणि इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी ही स्कूटर फायद्याची ठरणार आहे. या स्कूटरची नेमकी किंमत कशी असेल आणि ती तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल याबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.


स्कूटर खरेदी कशी करायची?


ओला कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही थेट बुक करू शकता. पण स्कूटरची डिलीवरी ही ऑक्टोबर 2021 पासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, ओला कंपनी ग्राहकांना टेस्ट राइड पण देणार आहे. टेस्ट राइडनंतर तुम्ही ही ऑर्डर रद्दही करू शकता.


स्कूटरची किंमत आणि फीचर्स


महाराष्ट्रात Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 99,999 रुपये आहे आणि S1 Pro ची किंमत 1,29,999 रुपये एवढी आहे. ई- स्कूटर ही 10 रंगाच्या वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही तुम्हाच्या आवडीनुसार स्कूटर बुक करू शकता.


या स्कूटरमध्ये ऑर्टिफिशियल साउंड सिस्टम, 4G कनेक्टिविटी सिस्टम त्यासोबतचं तुम्ही तुमचा स्मार्टफोन सुद्घा कनेक्ट करू शकता. 'Hey Ola' बोल्यावर ही ई-स्कूटर तुमचं सगळं काही ऐकणार आहे. ola इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.9 kWh क्षमतेचा बैटरी पैक असणार आहे. ज्यामध्ये तुम्ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 181 किलोमीटर चालवू शकता. 


6 तासात हा बैटरी पैक पुर्ण चार्ज होईल. या ई- स्कूटरचा टॉप स्पीड प्रतितास 115 किलोमीटर आहे, ज्यामध्ये तीन वेग-वेगळे ड्राइविंग मोड्स आहेत-नॉर्मल, स्पोर्ट आणि हाइपर. बँकच्या ऑफर्सनुसार S1 इलेक्ट्रिक स्कूटर 2,999 रुपये दरमहा आणि S1 pro ही 3,199 रुपये दरमहाच्या EMIवर  खरेदी करू शकता.