या `५` वेळेस नाही चालणार व्हॉट्सअॅपचे `रिकॉल` फिचर
व्हॉट्स अॅपने नुकतेच पाठवलेला मेसेज डिलिट करण्याचे फीचर अपडेट केले आहे.
मुंबई : व्हॉट्स अॅपने नुकतेच पाठवलेला मेसेज डिलिट करण्याचे फीचर अपडेट केले आहे.
नव्या फीचरमुळे चुकून गेलेला मेसेज डिलिट करण्याची सोय मिळणार आहे. व्हॉट्सअॅपने आइओएस आणि विंडोजसाठी हे रिकॉल फीचर दिले आहे. सध्या खूपच चर्चेमध्ये असलेले हे 'रिकॉल' फीचर या ५ स्थितींमध्ये मात्र तुम्ही वापरू शकणार नाहीत.
कोणत्या परिस्थितीमध्ये 'रिकॉल' फीचर चालणार नाही ?
1. व्हॉट्सअॅपचे 'रिकॉल' फीचर वापरण्यासाठी ते मेसएज पाठवणारा आणि मिळणारा अशा दोघांकडेही त्याचे अपडेटेड व्हर्जन असणं गरजेचे आहे.
2. नव्या फीचरनुसार, व्हॉट्सअॅप यूजर ब्रॉडकास्ट लिस्टद्वारा पाठवलेले मेसेज रिकॉल केले जाऊ शकत नाहीत.
3. पाठवलेला मेसेज रिकॉल करण्यासाठी केवळ ७ मिनिटांचा अवधी दिला जातो. म्हणजे ७ मिनिटांनंतर तुम्ही पाठवलेला मेसेज रिकॉल करू शकणार नाही.
4. समोरच्या व्यक्तीने न वाचलेला मेसेजच केवळ रिकॉल केला जाऊ शकतो. तुम्हांला मेसेज वाचला आहे की नाही हे ब्लू टिकवरून समजेल.
5. जर तुम्ही एखादा मेसेज कोट करून रिप्लाय केला असेल तर तो तुम्ही डिलिटि / रिकॉल करू शकणार नाही.
तुम्ही एखादा मेसेज रिकॉल केल्यास समोरच्या व्यक्तीला ते समजू शकते. कारण तेथे तुमच्या मेसेज ऐवजी केलेला मेसेज रिकॉल करण्यात आला आहे असे दिसेल.