स्काईपचे नवीन व्हर्जन लॉन्च
मायक्रोसॉफ्टने स्काईपचे नवीन व्हर्जन लॉन्च केले आहे. स्काईपच्या टीमने अँड्रॉइडवर स्काईपच्या नवीन आवृत्ती 8.0 ची ओळख करुन दिली आहे. आपण स्काईप 8.0 गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. या नंतर तो IOS, विंडोज आणि मॅकवर सुद्धा अपडेट केल जाणार आहे.
मुंबई : मायक्रोसॉफ्टने स्काईपचे नवीन व्हर्जन लॉन्च केले आहे. स्काईपच्या टीमने अँड्रॉइडवर स्काईपच्या नवीन आवृत्ती 8.0 ची ओळख करुन दिली आहे. आपण स्काईप 8.0 गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. या नंतर तो IOS, विंडोज आणि मॅकवर सुद्धा अपडेट केल जाणार आहे.
ह्या व्हर्जनमध्ये चॅट्स, कॅप्चर आणि फाईंड असे 3 टॅब असतील. स्काईपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये आपले खास क्षण शेअर करण्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय असतील, तसेच आपण चॅट मधल्या प्रत्येक मॅसेजवर रिअॅक्ट करू शकता, तसेच व्हिडिओ कॉलमध्येही रिअॅक्ट करू शकता.
ह्या स्काईप व्हर्जनमध्ये 'फाईंड' हे नवीन फीचर अॅड झाले आहे. यामध्ये GIFs सारख्या अनेक गोष्टी अटॅच करू शकता.