नवी दिल्ली : आतापर्यंत गाडीला हात लावल्यास अलार्म वाजत होता. मात्र आता स्मार्टफोनमध्येही अलार्म वाजणार आहे. मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी हा अतिशय चांगला पर्याय आहे. 


मोबाईलच्या सुरक्षिततेसाठी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या इच्छेविरूद्ध तुमच्या मोबाईलला कोणी स्पर्श केल्यास तुम्हाला हे लगेचच कळेल. कारण आता स्मार्टफोनमध्ये ही अलार्म वाजेल.


तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स:


यासाठी स्मार्टफोनमधील गूगल प्ले स्टोर मधून Don’t Touch My Phone – #1 Anti Theft Alarm हे मोबाईल अॅप इंस्टॉल करा. फोन कुठे ठेऊन जाल तेव्हा हे अॅक्टिवेट करा. फोन लॉक असताना देखील हे अॅप काम करते. त्यानंतर कोणीही मोबाईलला स्पर्श केल्यास अलार्म वाजत राहील. हे अॅप आतापर्यंत १० लाख लोकांनी वापरले आहे.


याव्यतिरिक्त तुम्ही दुसरे एक अॅप डाऊनलोड करू शकता. हे अॅप आहे Dont touch my phone 2017. हे अॅप देखील १५ डिसेंबर २०१७ ला अपडेट केले आहे. हे अॅप अॅनरॉईडच्या २.३ आणि त्याच्या वरच्या सर्व व्हर्जन्समध्ये काम करेल. हे आतापर्यंत ५ लाख लोकांनी वापरले आहे. गूगल प्ले स्टोर वर याची ४.४ इतकी रेटींग आहे.