स्मार्टफोन अॅपमुळे आरोग्यदायी आहार निवडण्यास मदत
अमेरिकेतील नॉर्थ युनिव्हर्सिटी आणि ऑस्ट्रेलियाच्या जॉर्ज इन्स्टीट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थच्या संशोधक टीमने हे अॅप विकसीत केले आहे.
वॉशिग्टन: आरोग्यदायी आहार कसा निवडायचा या प्रश्नावर अभ्यासकांनी एक उपाय शोधून काढला आहे. हा उपाय म्हणून अभ्यासकांनी एक अॅपच तयार केले आहे. हे अॅप किराणा दुकानांमध्ये खरेदी करताना आपल्याला पर्याय निवडण्यासाठी मदत करेन. अमेरिकेतील नॉर्थ युनिव्हर्सिटी आणि ऑस्ट्रेलियाच्या जॉर्ज इन्स्टीट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थच्या संशोधक टीमने हे अॅप विकसीत केले आहे.
'द फूड स्विच अॅप'
'द फूड स्विच अॅप' असे या अॅपचे नाव आहे. हे अॅप आपल्या ठरलेल्या वेळेनुसार २६८,००० उत्पादनांचा डेटाबेस अपडेट करते. याचा फायदा अॅपच्या वापरकर्त्याला मिळतो. या अॅपच्या मदतीने मोबाईल फोनच्या स्क्रीनवर टच करताच वापरकर्त्याला आहारचा बारकोड स्कॅन करताच त्या उत्पादनाचा पोषण स्तर पटकन कळू शकते. अॅपमध्ये असलेली माहिती वाचून वापरकर्ता आपल्या गरजेनुसार आहार निवडू शकतो.
आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे
दरम्यान, आजच्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्य टिकवायचे तर, योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. योग्य आहार न घेतल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. ज्याचा भविष्यात प्रचंड त्रास होऊ शकतो. म्हणूनच हे अॅप वापरकर्त्याला अत्यंत फायदेशीर ठरू शकेल, असा दावा अभ्यासकांनी केला आहे.