लंडन : स्मार्टफोनही सध्या काळाची बनत चाललाय. प्रत्येकजण आता दिवसातील मोठा काळ मोबाईलवर व्यतीत करत असतो. यामुळे कदाचित महत्त्वाची कामे होत असतीलही पण याचा वैयक्तिक आयुष्यावर विपरीत परिणाम होत असलेला समोर आलाय. स्मार्टफोनचा अतिवापर करणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. मोबाईल रेडिएशनचा तरुणांच्या स्मरणशक्तीवर वाईट परीणाम होतो. मेंदूच्या एका विशिष्ट भागावर रेडिएशनचा विपरित परिणाम होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. स्मार्टफोन वापरणाऱ्या मुलांच्या स्मरणशक्तीवर होणारा परिणाम समजण्यासाठी साधारण ७०० मुलांवर संशोधन करण्यात आले.


हेडफोनचा वापर 


स्वित्झर्लंडच्या स्विस ट्रॉपिकल आणि पब्लिक हेल्थ इंस्टीट्यूटच्या संशोधकांनी हे संशोधन केलंय. कॉर्डलेस संचार डिव्हाइसेसचे रेडियोफ्रीक्वेंसी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड (आरएफ-ईएमएफ) आणि युवकांच्या स्मृतीचा अभ्यास करण्यात आला. एका वर्षाहून अधिक काळ मोबाईल फोनचा वापर करणाऱ्यांच्या स्मरणशक्तीवर मोठा परीणाम होतो.  हेडफोन किंवा लाऊडस्पीकरचा वापर करून धोका कमी करता येईल असे  प्रमुख संशोधक मार्टिन रूसेली यांनी सांगितले.