मुंबई : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि आता अविभाज्य भाग बनला आहे. आपल्याला आता कोणतं ही काम करण्यासाठी स्मार्टफोनची गरज लागते. आपण सगळ्याच गोष्टीसाठी स्मार्टफोनवरती अवलंबून राहातो. पैसे पाठवणे, रस्ता शोधणे, फोटो काढणे, स्टोअर करणे, फोननंबर ठेवणे, मनोरंजन करणे इत्यादी सगळ्या गोष्टींसाठी आपण स्मार्टफोन वापरतो. आता तर कोव्हिडच्या काळानंतर शिक्षणासाठी देखील सगळे लोक स्मार्टफोनकडे वळले आहेत. ज्यामुळेच हे फोन आता आपल्या आयुष्यातील अविभाज्या भाग असल्याचे बोलेले जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच स्मार्टफोन हे आता स्टेटस सिम्बॉल बनले आहेत. काही फोन स्वस्त: असतात तर काही फोन हे महाग असतात. लोकं आपआपल्या गरजेनुसार फोन विकत घेतात. लोकांनी नवीन फोन घेतला की ते त्याच्यासोबत फोनसाठी कव्हर देखील विकत घेतात. यामुळे फोनचे संरक्षण होण्यासाठी मदत होते. त्याच प्रमाणे फोन हातातून पटकन सटकत नाही. याचबरोबर कव्हर वापरण्याचे अनेक फायदे असले तरी, त्याचे तोटे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.


आज आम्‍ही तुम्‍हाला यामुळे होणाऱ्या नुकसानाविषयी सांगणार आहोत, परंतु हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही स्वत: स्‍मार्टफोनवरील मोबाईल कव्‍हर काढून टाकू शकता.


1. मोबाईला कव्हर न लावल्यामुळे आणि वेळेवर साफ न केल्याने फोनच्या मागील पॅनलमध्ये घाण साचते. ज्यामुळे अनेक फोनला स्क्रॅचेस देखील पडू लागतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, जर तुम्ही वेळोवेळी मोबाईल कव्हर साफ केले नाही तर फोनमध्ये घाण होणे आणि ओरखडे पडल्याने नुकसान होते.


2. अनेक कंपन्या नवीन मस्त डिझाईनचे स्मार्टफोन बाजारात आणतात. दिसायला आकर्षक असण्यासोबतच ते महागही आहेत. परंतु एवढे पैसे देऊनही मोबाईल कव्हर लावल्यामुळे फोनचे डिझाईन लपवले जाते आणि लूक बाकीच्या मोबाईलसारखा सर्वसामान्य दिसतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, मोबाईल कव्हरशिवाय फोन खूपच स्टाइलिश आणि आकर्षक दिसतो.


3. स्मार्टफोनच्या जास्त वापरामुळे फोन गरम होतो. जर त्यात मोबाईल कव्हर लावले असेल, तर फोन खूप गरम होण्याची शक्यता असते. अति उष्णतेमुळे फोनच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. परंतु प्रत्येक मॉडेल गरम होत नाही, पण काही मॉडेल्सवर मात्र याचा परिणाम होतो.