मुंबई: आजकाल सर्वजण स्मार्टफोन वापरतात आणि सिनेमागृह बंद झाल्याने तरुणच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण OTTकडे वळल्याचं पाहायला मिळत आहे. ओटीटीवर सिनेमा, वेबसिरीज, डॉक्युमेंटरी पाहणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. तुम्हीही जर ओटीटी प्लॅटफॉर्म वापरत असाल ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 सप्टेंबरपासून स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी 5 नियमात बदल करण्यात आले आहेत. त्याचा थेट काय परिणाम होणार हे नियम कोणते आणि कसे बदलण्यात आले आहेत. ते आज आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मपासून ते शॉपिंगसाईटपर्यंत सगळ्याचेच दर वाढणार आहेत. 


1 सप्टेंबरपासून OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन महागणार आहे. युझर्सना बेस प्लॅनसाठी 399 रुपयांऐवजी 499 रुपये मोजावे लागणार आहेत. युझर्सला आधीच्या प्लॅनपेक्षा आता 100 रुपये जादा भरावे लागणार आहेत. त्याच वेळी, 899 रुपयांमध्ये, युझर्सना फोनमध्ये Disney + Hotstar अॅप चालवू शकतील. तसेच, या सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये HDमध्ये देखील उपलब्ध असणार आहे. तुम्ही हे अॅप 4 स्क्रीनवर 1,499 रुपये मोजून 4 क्रिनवर वापरू शकता. 


1 सप्टेंबरपासून अमेझॉनवरून ऑर्डर करणं महाग होऊ शकतं. डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे कंपनी लॉजिस्टिक्स खर्च वाढवू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला 500 ग्रॅमच्या पॅकेजसाठी 58 रुपये मोजावे लागू शकतात. राज्यानुसार किंवा विभागानुसार खर्च 36.50 रुपये असेल.


15 सप्टेंबरपासून गुगल प्ले स्टोअरवरील 100 अॅपसाठी विशेष दस्तऐवज आणि काही तरतुदी नियम बदलण्यात आले आहेत. ते दिल्याशिवाय तुम्हाला हे अॅप वापरता येणार नाहीत. गुगल ड्राईव्ह युझर्ससंदर्भात 13 सप्टेंबरला एक अपडेट मिळणार आहे. त्यानुसार गुगल असिस्टंटची जागा आता गुगल ड्राईव्ह घेणार का हे पाहावं लागणार आहे.