मुंबई: बऱ्याचदा आपला फोन खूप चांगला असतो फक्त आपल्याला त्याची रॅम अपुरी किंवा कमी पडू लागते. अशावेळी फोन हँग होणं आणि त्यासोबत अनेक तक्रारी जाणवायला लागतात. तुमच्या फोनची रॅम कमी असेल तरीसुद्धा सुसाट वेगानं तुमचा फोन चालेल त्यासाठी आज सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा फोन चांगल्या पद्धतीनं वापरू शकता. ज्यामुळे तो हँग होणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नको असलेले फोटो व्हिडीओ वेळच्या वेळी डिलीट करा. त्याच सोबत आपल्या फोनमध्ये कायम रनिंग अॅप्स क्लीअर करत राहा. त्यामुळे रॅम जास्त भरणार नाही. नको असलेले अॅप वेळच्या वेळी उडवून टाका.


आपल्या फोनमध्ये कायम अपडेट व्हर्जन येत राहतात. काहीवेळा आपण डेटा जाईल किंवा मोबाईलची रॅम भरेल म्हणून अपडेट करत नाही. मात्र ही चूक करू नका. वेळच्या वेळी सॉफ्टवेअर अपडेट करत राहा. Settings > About Phone > software updates मध्ये जाऊन आपलं सॉफ्टवेअर अपडेट करा. 


बऱ्याचदा आपल्या फोनमध्ये लाईव्ह वॉलपेपर सुरू असतो. त्यामुळे मोबाईलच्या सॉफ्टवेअरला जास्त काम करावं लागतं. त्यामुळे फोनची बॅटरीही लवकर उतरते. ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्या फोनमधील लाईव्ह वॉलपेपरचा पर्याय बंद ठेवा. त्याशिवाय फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन About Phone > Software informationमध्ये Build Numberवर सिलेक्ट करा. त्यामुळे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. तिथे अॅनिमेशन सेटिंगमध्ये बदल करा. स्क्रिनची वॅल्यू  0.5X सेट करा. 


काही लोकं आपल्या फोनमध्ये वेजेस ठेवतात. ती चूक तुम्ही करू नका त्यामुळेही तुमचा फोन हँग होऊ शकतो. कायम आपल्या फोनमधील वेजेस क्लिअर करणं गरजेचं आहे. सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर काहीवेळा आपल्या फोनमध्ये काही नवीन अॅप देखील येतात. जे अॅप आवश्यक नाहीत त्यांना तातडीनं डिलीट करा.