जबरदस्त ! Mood सांगणारे Calling Smartwatch, एकदा चार्ज केल्यावर चालणार 7 दिवस
FitShot Connect : स्मार्टवॉच भारतीय स्मार्ट वेअरेबल मार्केटमध्ये फिटशॉटचा प्रवेश केला आहे. स्मार्ट वेअरेबल मार्केटमध्ये अलिकडच्या वर्षांत तेजी दिसून आली आहे.
मुंबई : FitShot Connect : स्मार्टवॉच भारतीय स्मार्ट वेअरेबल मार्केटमध्ये फिटशॉटचा प्रवेश केला आहे. स्मार्ट वेअरेबल मार्केटमध्ये अलिकडच्या वर्षांत तेजी दिसून आली आहे. जी 2020 नंतर कोविड-19 साथीनंतर यात आणखी वाढ झाली आहे. या स्मार्टवॉचने मोठी ओळख निर्माण केली आहे. ज्यामुळे यूजर्सला त्याच्या कार्यक्षमतेचा अंदाज मिळत आहे. फिटशॉट कनेक्ट 1.85-इंच डिस्प्लेबरोबर सोलोसिंक टेक्नोलॉजीचा उपयोग केला गेला आहे. FitShot Connect ची कीमत (FitShot Connect Price In India) आणि फीचर्स जाणून घ्या.
FitShot Connect Price In India
FitShot Connect स्मार्टवॉचसाठी 1 वर्षाची वॉरंटी देत आहे. 12 ऑगस्टपासून 2,999 रुपयांना उपलब्ध होईल. हे डिव्हाइस तीन रंगात उपलब्ध आहे. काळा, हिरवा आणि निळा, अशा रंगात भारतात फ्लिपकार्टद्वारे खरेदी केले जाऊ शकते.
फिटशॉट कनेक्ट तपशील
FitShot एक लाइफस्टाइल इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक आहे आणि FitShot Connect ची वैशिष्ट्ये भारतीय बाजारपेठेला आवडतील अशी अपेक्षा आहे. स्मार्टवॉच 500 निट्सपर्यंत ब्राइटनेस देण्यास सक्षम आहे.
कनेक्ट स्मार्टवॉचमध्ये आरोग्य आणि फिटनेस मॉनिटरिंग अॅप्स देखील उपलब्ध आहेत. यूजर्स त्यांच्या सेन्सरचा वापर करून त्यांच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी (SpO2), रक्तदाब आणि मूडचे निरीक्षण करु शकतात. 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड आहेत तर गॅझेटची 300mAh बॅटरी 7 दिवसांपर्यंतची चालू राहू शकते.
फिटशॉट कनेक्टची वैशिष्ट्ये
फिटशॉट कनेक्ट 100 हे घड्याळ फेस, तीन मेनू पर्याय आणि दोन इन-बिल्ट गेमसह येते. नवीन स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग देखील सक्षम आहे आणि सोलोसिंक तंत्रज्ञान कनेक्टद्वारे भारतात प्रथमच प्रवेश करत आहे. या स्मार्टवॉची आवाज ओळखण्याची चांगली क्षमता आहे. यात रिमोट कॅमेरा शटर, हवामान अंदाज आणि इतर अनेक सूचना आणि अलार्म यांचा समावेश आहे. धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी याला IP68 रेट केले जाते, तर बॅटरी 2 तासांच्या आत पूर्णपणे चार्ज होते.