मुंबई : मराठा क्रांती मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत गर्दीचा उच्चांक नोंदविला जाण्याची शक्यता आहे. कालपासून मोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक येत आहे. हा विक्रमी मोर्चा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना सोशल मीडियावरही मराठा मोर्चाचा ट्रेंड दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावरही मोर्चाची धूम दिसत आहे. मराठा क्रांती मोर्चा ट्विटरवरही ट्रेंडींगमध्ये आला, मुंबईच्या ट्रेंडमध्ये मोर्चाने दुसरा नंबर मिळवलाय. त्यामुळे सध्या मराठा मोर्चाची चर्चा असल्याचे पाहायला मिळत आहे.



मराठा मोर्चासाठी येणाऱ्या वाहानांची संख्या क्षणोक्षणी वाढतेय आणि त्याचा परिणाम आता मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या वाहतुकीवर होऊ लागला आहे. पूर्व द्रूतगती मार्गावर मुंबईचं प्रवेशद्वार असणाऱ्या ठाण्याच्या आनंदनगर चेक नाक्यावर भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे टोलनाक्यावरही टोल घेणे थांबविण्यात आलेय.