या सोप्या टिप्सनंतर कधी हँग नाही होणार तुमचा फोन, स्पीड वाढेल
नवे फोन सुरूवातील चांगल्या स्पीडने काम करतात. पण काही काळाने त्याचा स्पीड कमी होतो. युजर्स कमी स्पीड आणि लोडिंगमुळे नंतर इरिटेट होतो.
नवी दिल्ली : नवे फोन सुरूवातील चांगल्या स्पीडने काम करतात. पण काही काळाने त्याचा स्पीड कमी होतो. युजर्स कमी स्पीड आणि लोडिंगमुळे नंतर इरिटेट होतो.
तसेच फोही हँग होतो. काही दिवसांनंतर अॅप्स ओपन होण्यात खूप वेळ लागतो. तर कधी कधी फोन आपोआप रिस्टार्ट होतो. पण आता या सर्व समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी आम्ही तुम्हांला काही टिप्स सांगणार आहोत. त्या तुम्ही घर बसल्या केल्यास या समस्यांपासून सुटका मिळू शकतात.
या ट्रिक्सने फोनचा परफॉर्मन्स आणि स्पीड दोन्ही वाढू शकतात.
काय कराल
१) सर्वात प्रथम फोनच्या सेंटिंगमध्ये जा...
२) सर्वात खाली अबाऊट फोनच्या पर्यायाल क्लिक करा.
३) त्यानंतर खाली स्क्रोल केल्यावर बिल्ड नंबरचे ऑप्शन असेल
४) त्यानंतर बिल्ड नंबरवर तुम्हांला सहा ते सात वेळा क्लिक करायचे आहे.
५) त्यानंत एक मेसेज येणार त्यात डेव्हलपर्स ऑपश्न ऑन करण्यात आला आहे.
६) आता बाहेर आल्यावर तुम्हांला सेटिंगमध्ये डेव्हपर्स ऑप्शनचा पर्याय दिसणार
७) त्यानंतर तुम्ही डेव्हपर्स ऑप्शनला क्लिक करू ऑन करा.
८) ऑन केल्यावर खाली खूप ऑप्शन येतील, स्क्रोल केल्यावर अॅनिमेशन ड्युरेशन स्केलचा पर्याय येईल त्याल क्लिक करा.
९) त्यात तुम्ही स्क्रिन अॅनिमेशनला कमी करा, किंवा ऑफ करून द्या.
१०) असे केल्यास स्मार्टफोनचा स्पीड फास्ट होईल आणि फोनच्या परफॉर्मन्सची कोणतीच समस्या नसेल. तसेच फोन हँग होणार ना