Electric Vehicle sound alert feature: देशात गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहता इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिलं जात आहे. पण असं असलं तरी तुमच्या आजूबाजूला इलेक्ट्रिक वाहन चालल्याचा आवाज तुम्ही कधी ऐकला आहे का? नाही ना...इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याने या गाड्यांमधून आवाज येत नाही जेव्हा जेव्हा इलेक्ट्रिक वाहने कमी वेगाने धावतात तेव्हा आवाज येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता जास्त असते. आता इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने बदल होतील जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने साउंड अलर्ट आवश्यक असेल. 20-30 किमी प्रतितास वेगाने वाहनांमध्ये हा विशेष आवाज आवश्यक असेल. या संदर्भात, CMVR-TSC ने अंतिम मसुद्याला मान्यता दिली आहे. मात्र हा विभाग रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीत असेल. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये स्थिर ध्वनी प्रभाव टाकण्याची व्यवस्था वाहन उत्पादकांना करावी लागेल.


काय बदल जाणून घ्या


  • कमी वेगाने धावताना वेगळा आवाज असेल

  • 20-30 किमी प्रतितास वेगाने वाहनांमध्ये विशेष आवाज आवश्यक असेल

  • आवाज पादचाऱ्यांना सतर्क करेल

  • नवीन साउंड फीचरमुळे आजूबाजूला फिरणारे लोक सतर्क होतील


अपघाताच्या घटना वाढत होत्या


वास्तविक, जेव्हा जेव्हा एखादं इलेक्ट्रॉनिक वाहन धीम्या गतीने चालते तेव्हा आवाज ऐकू येत नाही. अशा परिस्थितीत अपघाताची शक्यता वाढते. यावर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये साउंड फीचर जोडणार आहेत. हे फीचर जोडल्यानंतर आजूबाजूला फिरणारे लोक आवाजाने अलर्ट होतील. कारण वारा, टायरमधून निघणारा आवाज पुरेसा असतो, त्यामुळे एखादे वाहन येत असल्याचे लोकांना आधीच कळते.