नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या आधी स्पेक्ट्रा कंपनीने मोठा धमाका केला आहे. 


१ जीबीपीएस वेग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पेक्ट्रा कंपनीने दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुडगाव, बंगळुरू, मुंबई आणि चेन्नई अशा शहरांमध्ये 1 जीबीपीएसचा प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅननुसार स्पेक्ट्रा कंपनी घरगुती ब्रॉडबँड ग्राहकांना 799 रुपयांमध्ये 1 जीबीपीएस वेगाने इंटरनेट कनेक्शन देईल. यात 150 जीबी डेटा प्रति महिना लिमिट असेल. 


ब्रॉडबँड कनेक्शन ऑफर


स्पेक्ट्राचे सीईओ उदित मेहरोत्रा ​​यांनी माहिती दिली की, कंपनीने भारतातील सर्वात वेगवान ब्रॉडबँड सेवा सुरू केली आहे. ज्यामध्ये घरगुती ग्राहकांसाठी डाउनलोड स्पीड 1 जीबीपीएस मिळेल. या सेगमेंटमध्ये भारत बाकीच्या देशांच्या तुलनेत समतोल राखेल. मेहरोत्रा ​​यांनी सांगितले की, कंपनीने 1 जीबीपीएस स्पीड असलेल्या ब्रॉडबँड कनेक्शनची ऑफर सुरू केली आहे आणि हळुहळु सर्व ग्राहकांना हा प्लॅन लागू होईल. कंपनीने ही ब्रॉडबँड सेवा मार्च 2018 पर्यंत तीन आणखी शहरामध्ये सुरू करेल.


1149 मध्ये अनलिमिटेड डेटा


मेहरोत्रा ​​यांनी सांगितले की, 1 जीबीपीएस इतका बँडविड्थ असतो की  ग्राहक इंटरनेटवर जे काही करू इच्छितो ते सर्व करु शकतो. स्पीड वाढवण्यासोबतच आम्ही किंमतीकडे देखील लक्ष दिलं आहे. 799 रुपयांमध्ये 150 जीबी डेटा मिळेल तर अनलिमिटेड डेटासाठी 1149 रुपये द्यावे लागणार आहे. कंपनी नवी दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुडगांव, बंगळुरु, मुंबई आणि चेन्नई अशा शहरांमध्ये ब्रॉडबँड सेवा देत आहे.