एक छोटीशी चूक आणि Starbucks चे कोट्यवधी रुपये वाचले
`गेम ऑफ थ्रोन्स` (GoT) या मालिकेच्या एका भागात टेबलावर गडद रंगाचा एक कॉफीचा कप दिसतोय
मुंबई : एखाद्या कंपनीला आपलं प्रोडक्ट आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, हे आपल्या आजुबाजुला उगवलेल्या मार्केटिंग कंपन्यांच्या संख्येवरून तुमच्या सहजच लक्षात येईल. जाहिरातीसाठी कंपन्या लाखो - करोडो रुपये खर्च करतात. पण, अशावेळी एखाद्या कंपनीची फुकटात जाहिरात होऊन गेली तर... असंच काहीसं घडलंय स्टारबक्स (Starbucks) या कंपनीसोबत... अमेरिकन कॉफी कंपनी Starbucks ला जवळपास २.३ बिलियन डॉलर (१६००० करोड) वाचलेत... आणि कंपनीची मोफत जाहिरातही झालीय.
'गेम ऑफ थ्रोन्स' (GoT) या मालिकेच्या एका भागात टेबलावर गडद रंगाचा एक कॉफीचा कप दिसतोय. हा फोटो सोशल मीडिया खूपच व्हायरल होतोय. Online frenzy नं यावर बोट ठेवत 'अरे ही तर Starbucks ची कॉफी आहे' असं म्हटलंय.
गेम ऑफ थ्रोन्सच्या शेवटच्या सीझनच्या चौथ्या भागात दिसलेला कॉफीचा कप ही एक चूक होती, असं HBO नेटवर्कनं स्पष्ट केलंय. 'न्यूयॉर्क पोस्ट'नुसार, हा एक कॉ़फी कप आहे जो शुटिंग दरम्यान कॉफी शॉपमधून मागवण्यात आला होता. तो चुकून टेबलावरच राहिला आणि शुटींगही पार पडलं.
जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, माऊथ पब्लिसिटीचा Starbucks ला चांगलाच फायदा झाला आहे. जाहिरातीसाठी जिथे २.३ बिलियन डॉलर खर्च करावा लागला असता तेवढी प्रसिद्धी Starbucks ला फुकटात मिळालीय.
एन्टरटेन्मेंट मार्केटिंग एजन्सी Hollywood Branded चे CEO स्टॅन्सी जोन्स यांच्या म्हणण्यानुसार, एका छोट्याशा चुकीचा हा Starbucks साठी झालेला चांगला परिणाम म्हणावा लागेल. जाहिरात क्षेत्रात ही एक असामान्य घटना ठरलीय. स्टारबक्ससाठी ही 'once in a lifetime collision of opportunity' घटना आहे, असंही म्हटलं जातंय.