मुंबई : काळापैसा संपवण्यासाठी २०१६ मध्ये नोटाबंदी करण्यात आली. या दरम्यान 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने २ हजाराची नोट पहिल्यांदाच चलनात आणली, तर ५०० रूपयांची नवी नोट देखील चलनात आली. या नोटांची सुरक्षा लक्षात घेता, या नोटांवर नवे सुरक्षा फीचर्स जोडण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरी देखील बाजारात मागील काही दिवसांपासून नकली नोटा चलनात येत आहेत. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने देशाच्या जनतेला इशारा दिला आहे. शंका अशीच आहे की, बाजारात या नोटांचं चलन वेगाने वाढत आहे. चलनात सध्या असलेल्या नोटांसारख्याचं काही नकली नोटा असण्याची दाट शक्यता आहे


SBI चा इशारा


स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ऑफिशियल ट्वीटरवर ग्राहकांना मेसेजने अलर्ट दिला आहे. ट्वीटमध्ये म्हटलं आहे, नकली आणि असली नोटांमध्ये फरक समजणे महत्त्वाचे आहे. 


नोटा नीट पाहा आणि ओळखा की नोटा ओरिजिनल आहेत किंवा नाही. यात नकली आणि ओरिजनल नोटा कशा ओळखायच्या हे समजावण्याचा प्रयत्न एसबीआयने केला आहे. आरबीआयने देखील आपल्या अधिकृत वेबसाईटवर यांची माहिती दिली आहे.


काय आहे 2000 रूपयांच्या नोटेची साईझ?


२ हजारच्या नोटेचा रंग बेस कलर मॅजेंटा आहे. या नोटची साईझ ६६ मिमी बाय १६६ मिमी आहे. नोटेच्या एका बाजूला महात्मा गांधी आणि मागील बाजूला मंगलयानाचा फोटो छापलेला आहे.



500 रूपयाची नोट कशी ओळखाल?


500 रूपयाच्या नोटेचा रंग, थीम, डिझाईन आणि सिक्योरिटी फीचर जुन्या नोटेच्या तुलनेत वेगळे आहेत. 500 च्या नोटेचा आकार 63 मिमी बाय 150 मिमी आहे. हा रंग स्टोन ग्रे आहे. 


या नोटेची थीम दिल्लीच्या ताजमहालावर आधारीत आहे. यावर स्वच्छ अभियानाचा लोगो लागलेला आहे.