नवी दिल्ली : तुम्हाला स्टार्टअप सुरु करायचा तर सुभाषचंद्रा फाऊंडेशन तुम्हाला एक सुवर्ण संधी उपलब्ध करुन देत आहेत. सुभाष चंद्रा फाऊंडेशनने मंगळवारी एस्सेलेरेटर(Esselerator) हा उपक्रम लाँच केलाय. या अंतर्गत मीडिया अँड एन्टरटेनमेंट, मीडिया टेक आणि शिक्षण क्षेत्रात स्टार्टअप सुरु करणाऱ्यांसाठी मदत मिळणार आहे. सुभाष चंद्रा फाऊंडेशनच्या मते हा एक नवा प्रयत्न आहे. हा कार्यक्रम एस्सेल ग्रुप आणि TiE Mumbai यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचे औचित्य साधत राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा म्हणाले,  दूरदृष्टी आणि अविरत उद्योजकतेच्या भावनेने प्रेरित होत गेल्या ९० वर्षांच्या या प्रवासात एस्सेलग्रुपने बरेच यश संपादन केलेय. हाच वारसा पुढे नेण्यासाठी सुभाष चंद्रा फाऊंडेशन सुरु करण्यात आलेय. यामुळे उदयोन्मुख उद्योजक तसेच शैक्षिणक संस्थांना आर्थिक सहाय्य होण्यासोबतच साखळी मॉडेल उभारण्यास होण्यास मदत होईल.



ते पुढे म्हणाले, सुभाष चंद्रा फाऊंडेशनकडून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये TiE Mumbai यांचीही भागीदारी असणार आहे. तसेच त्यांनी पुढे सांगितले की, एस्सेलरेटर उपक्रम लाँच करताना मी तुम्हाला विश्वास देतो की, आम्ही नव्या विचारांचे प्रतिभावान उद्योजकांचा शोध घेणार आहोत, जे व्यवसायाच्या नव्या मॉडेलचे उदाहरण ठरतील त्यासोबतच राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावतील. 


ZEEL इंटरनॅशनल ब्रॉडकास्ट बिझनेसचे सीईओ अमित गोएंका म्हणाले, या नव्या बिझनेस मॉडेलच्या रुपाने देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हा उपक्रम सुरु कऱण्यामागे रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे  सुभाष चंद्रा यांचा हा उद्देश आहे. मनोरंजन, मीडिया आणि शिक्षण क्षेत्रात नव्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा एस्सलेरटेरचा उद्देश आहे. 


या उपक्रमात एस्सेल ग्रुपसोबत TiE Mumbai ही कंपनी भागीदारी करणार आहे. या कंपनीच्या मते, मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात अनेकदा काही समस्यांचा सामना करावा लागतो. हा उपक्रम या क्षेत्रात नवे स्टार्टअप सुरु करणाऱ्यांसाठी नक्कीच मदत करेल. आम्ही एस्सेल ग्रुपसह मिळून मीडिया टेक आणि एज्युटेकच्या क्षेत्रात परिपक्व तंत्र विकसित करु.



राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा यांनी चांगल्या समाजासाठी योगदान आणि सहयोगासाठी सुभाष चंद्रा फाऊंडेशनची निर्मिती केलीये. याचा उद्देश सर्वसमावेशक आणि समृद्ध समाजाची निर्मिती करणे आहे. सामाजिक, आर्थिक आणि असमानतेमुळे समाजात मागास राहिलेल्या लोकांना मदत करणे हे या फाउंडेशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे फाऊंडेशन संपूर्ण देशात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, उद्योजकता, बाल कल्याण आणि सामाजिक न्यायासाठी काम करत आहे. 


१९९२मध्ये स्थापन झालेली टीआयई मुंबई ही एक ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी संस्था आहे. यांचा उद्देश नेटवर्किंग, शिक्षण, विकास आणि गुंतवणुकीच्या मदतीने रोजगार सुरु करण्यास सहाय्य करणे. सध्याच्या स्थितीला ही कंपनी जगातील सर्वात उद्यमशील संघटना आहे. टीआयईकडून वर्षभरात उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईसह अनेक ठिकाणी अनेक उपक्रम राबवले जात आहेत.