नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज या ट्वीटरवर सक्रिय आहेत, स्वराज हे लोकांच्या मदतीसाठी नेहमीच तयार असतात. सुषमा स्वराज यांना येणाऱ्या ट्ववीटचाही ते प्रामुख्याने विचार करतात, यावर त्या स्वत: उत्तर देखील देतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका व्यक्तीने सुषमा स्वराज यांना ट्ववीट करून विचारलं, मी मंगळावर अडकलो आहे, मंगलयान-२ तुम्ही कधी पाठवणार आहात, सुषमा स्वराज यांना ही फिरकी लगेच समजली आणि त्यांनीही लगेच फिरकी घेत उत्तर देऊन टाकलं, मंगळवारही भारतीय दूतावास तुमच्या मदतीसाठी तयार आहे.


अमेरिकेतील शिकागोमधील रहिवासी, करण सैनी यांनी ट्ववीट केलं, सुषमाजी मी मंगळवार अडकलो आहे, 987 दिवस आधी तुम्ही मंगळयानमधून खाण्याचं साहित्य पाठवलं होत, ते आता संपलं आहे.


मंगळयान-२ तुम्ही कधी पाठवणार आहात?, यावर सुषमा स्वराज यांनी उत्तर दिलं, जर तुम्ही मंगळावर अडकले असाल, तर भारतीय दुतावास तिथे देखील तुमची मदत करणार आहे, सुषमा स्वराज यांचं ट्ववीट व्हायरल झालं आहे.