सुझुकीची शानदार इंट्रूडर १५०सीसी बाईक लॉन्चसाठी सज्ज
सुझुकी मोटारसायकल इंडिया कंपनी आपली नवीन १५० सीसी क्रूजर बाईक इंट्रूडर भारतात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. या नव्या Intruder 150 बाईकचं डिझाईन Intruder M1800R सारखंच ठेवण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : सुझुकी मोटारसायकल इंडिया कंपनी आपली नवीन १५० सीसी क्रूजर बाईक इंट्रूडर भारतात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. या नव्या Intruder 150 बाईकचं डिझाईन Intruder M1800R सारखंच ठेवण्यात आलं आहे.
भारतात लॉन्च होण्यापूर्वी या बाईकचं ब्रोशर लीक झालं आहे. ज्यात या बाईकची सर्व माहिती देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या बाईकच्या खास गोष्टी...
- या बाईकच्या डिझाईनसाठी सुझुकी इंट्रूडर एम१८०० या बाईकच्या डिझाईनमधून आयडिया घेण्यात आलीये. या बाईकची इनव्हर्टेड ट्रॅंग्युलर हेडलाईट फ्य़ूअल टॅंकपर्यंत पसरली आहे. इंजिन काऊलचा खालील भाग आधीपेक्षा दिसायला आणखी वजनी वाटत आहे.
- या बाईकमध्ये रायडर आणि पिलियन सीट वेगळ्या आहेत. रूंद हॅंडलबार्स आणि लो सीट देण्यात आली आहे.
- यात सुझुकी जिक्सरचं १५४ सीसीचं सिंगल सिलेंडर इंजिन लावण्यात आलं आहे. जिक्सरचं इंजिन १४.८ पीएसची पावर जनरेट करतं. हे इंजिन ६ हजार आरपीएमवर १४ न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं. यात ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आलाय.
- या बाईकची फ्रेम जिक्सरसारखीच आहे. फ्रंटला टेलिस्कोपिक फॉर्क आणि मागे मोनोश‘ओकर दिलं गेलंय. अलॉय व्हिल्स आणि टायर्स रेग्युलर मॉडेलसारखेच आहेत.
- ब्रेक्सबद्दल सांगायचं तर नवीन Suzuki Intruder 150 च्या दोन्ही टायर्सना डिस्क ब्रेक आहेत. फ्रंट फेंडरवर एबीएस स्टिकर आहेत. यात अॅंटी ब्रेक सिस्टीमही देण्यात आलंय.
- भारतात लॉन्च झाल्यानंतर सुझुकी इंट्रूडर १५० सीसी क्रूझर बाईकची स्पर्धा मुख्यत्वे बजाज अॅव्हेंजर स्ट्रीट १५० सोबत होणार आहे.
- किंमतीच्या बाबतीत या नवीन बाईकची किंमत जिक्सर एसएफ एबीएस व्हेरिएंटच्या तुलनेत १० हजार ते १२ हजारांनी महाग असण्याची शक्यता आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत १ लाख रूपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.