मुंबई: सुझुकी मोटारसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (एसएमआयपीएल) त्यांची स्पोर्ट्स श्रेणीतील बाईक हयाबुसाची नवी आवृत्ती बाजारात आणली आहे. भारतीय परिस्थिती लक्षात घेऊन त्यामध्ये दोन बाजूचे साइड रिफ्लेक्टर ठेवले आहेत. बाईकला मेटॅलिक ग्रे आणि ग्लास स्पार्कल ब्लॅक या दोन रंगात लॉन्च करण्यात आले आहे. एसएमआयपीएल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सातोशी उचिदा यांनी सांगितले की, 'हयाबुसाच्या नव्या आवृत्तीमधील रंग लोकांना आकर्षिक करणारे ठरणार आहेत.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हयाबुसाची एक्स शोरुम किंमत १३ लाख ७४ हजार रुपये आहे. हयाबुसाच्या मागील आवृ्त्तीतील बाईकच्या तुलनेत या बाईकची किंमत १७ हजार रुपयांनी अधिक आहे. नव्या मॉडेलमध्ये १ हजार ३४० सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. तसेच या बाईकमध्ये १९७ क्षमतेचे बीएचपी देण्यात आली आहे. ब्रेक हॉर्स पावर (बीएचपी) वाहनांतील इंजिनवर येणारे प्रेशर नियंत्रणात ठेवते. हयाबुसाची या स्पोर्ट्स बाईकला ०-१०० किमी/तास वेग पकडण्यासाठी केवळ २.७४ सेकंदांचा कालावधी लागणार आहे.


सुझुकीने डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला या बाईकची बुकिंग सुरु केली होती. बाईकची बुकिंग १ लाख रुपयांना सुरू करण्यात आली. सुझुकी हयाबुसाला १९९९ साली पहिल्यांदाच लॉन्च करण्यात आले होते. हयाबुसाच्या बाईकने जगभरात सर्वात जलद धावणाऱ्या बाईकचा मान पटकावला होता. भारतात पहिल्यांदा २०१७ मध्ये ही बाईक लॉन्च करण्यात आली होती.