नवी दिल्ली : वेगाचं वेड आणि बाईक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सुजुकी मोटरसायकल कंपनीने आपल्या गाडीच्या किंमतीत तब्बल 2.2 लाख रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक गूडन्यूज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुजुकी मोटरसायकल इंडियाने आपल्या GSX-R1000R आणि हायाबुसा यांच्या किंमतीत 2.2 लाख रुपयांपर्यंत कपात केली आहे. कस्टम ड्युटीत घट झाल्याने या गाड्यांच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. 


किती झाली कपात 


सुजुकी कंपनीने आपल्या GSX-R1000R मॉडेलच्या किंमतीत 2.2 लाख रुपयांनी कपात केली आहे. यामुळे आता गाडीची किंमत 19.8 लाख रुपये झाली आहे. यापूर्वी या गाडीची किंमत जवळपास 22 लाख रुपये होती. याच प्रमाणे हायाबुसाच्या किंमतीतही 18,623 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आता या मॉडेलची किंमत 13.59 लाख रुपये झाली आहे. पूर्वी या मॉडेलची किंमत 13.87 लाख रुपये इतकी होती.


प्रीमिअम रेंजमध्ये येणार नव्या बाईक्स 


सुजुकी मोटरसायकल इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष संजीव राशेखरन यांनी सांगितले की, कंपनी प्रीमअम रेंजवर फोकस करत आहे. सरकारतर्फे मिळणारे सर्वच फायदे ग्राहकांना तात्काळ मिळावे यासाठी कंपनी प्रयत्नशील असते.